ETV Bharat / bharat

Independence Day 2023 : यंदा देशाचा 'स्वातंत्र्यदिन' 76 वा की 77 वा? जाणून घ्या माहिती

दरवर्षीच्याच उत्साहात आपण भारतीय यंदाही 'स्वातंत्र्य दिन' साजरा करणार आहोत. देशाचा प्रत्येक कोपरा तिरंग्याच्या रंगांनी रंगलेला दिसत आहे. मात्र, यंदाचा 'स्वातंत्र्यदिन' कितवा, ७६ वा की ७७ वा? असा प्रश्न काहींच्या मनात आहे. आम्ही या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. चला तर मग त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

Independence Day 2023
स्वातंत्र्य दिन 2023
author img

By

Published : Aug 14, 2023, 10:41 AM IST

Updated : Aug 14, 2023, 6:50 PM IST

हैदराबाद : आपण सर्वजण १५ ऑगस्ट रोजी 'स्वातंत्र्यदिन' साजरा करण्यासाठी सज्ज आहोत. स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ लढा देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदान आणि त्यागामुळे आपण इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त झालो. हा दिवस केवळ साजरा करण्याचाच, नाही तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी (Independence Day 2023) लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचाही आहे. या दिवशी संपूर्ण भारतातील संस्था आणि प्रतिष्ठित इमारतींवर राष्ट्रध्वज फडकवला जातो. मात्र, हा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार की ७७वा, याबाबत लोकांमध्ये संभ्रम वाढत चालला आहे.

15 ऑगस्ट 2023 रोजी कितवा 'स्वातंत्र्यदिन' आहे? दरवर्षीप्रमाणे यंदाही भारताचा कितवा 'स्वातंत्र्यदिन' साजरा करणार, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. भारत १९४७ साली स्वतंत्र देश झाला. म्हणजे १९४७ सालचा १५ ऑगस्ट हा आपला पहिला 'स्वातंत्र्यदिन'. त्या न्यायाने आपण यंदा देशाचा ७७ वा 'स्वातंत्र्यदिन' साजरा करणार आहोत. 1948 साली स्वातंत्र्य मिळून एक वर्ष पूर्ण झाले. म्हणून तो पहिला 'वर्धापनदिन'. म्हणजे यंदा आपण देशाच्या स्वातंत्र्याचा ७६ वा 'वर्धापनदिन' साजरा करणार आहोत. या दिवशी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या अनेक लढाया आणि बलिदानाची ही ऐतिहासिक वास्तू साक्षीदार आहे.

१५ ऑगस्टलाच स्वातंत्र्यदिन का निवडला? - 18 जुलै 1947 रोजीच भारताला स्वातंत्र्य मिळाले असे म्हटले जाते. परंतु, तरीही त्यासाठी स्वातंत्र्यदिन म्हणून १५ ऑगस्टला ओळख मिळाली. त्यामागील वास्तव असे आहे की, तत्कालीन आणि शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीचा दुसरा वर्धापनदिन भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणून निवडला. कारण त्यांनी हा दिवस स्वतःसाठी शुभ मानला. म्हणून १५ ऑगस्ट हा दिवस भारतासाठी 'स्वातंत्र्यदिन' म्हणून निवडण्यात आला.

हेही वाचा :

  1. Independence Day : तिरंग्याचे ध्वजारोहण करण्याकरिता काय आहेत नियम? जाणून घ्या ध्वजारोहणाशी सर्व नियम
  2. Independence Day 2023 : केवळ कोहिनूरच नाही तर 'या' मौल्यवान वस्तूचीही इंग्रजांनी केली भारतातून चोरी
  3. Independence Day 2023 : भारतच नाही तर या पाच देशांनाही मिळाले १५ ऑगस्टला स्वातंत्र्य...

Last Updated : Aug 14, 2023, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.