नवी दिल्ली भारत आज आपला 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे 75th independence day मात्र सोशल मीडियावर काही जण स्वातंत्र्याच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या तर काही 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत Independence day तर काहीजण सोशल मीडियावर भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या 2022 च्या शुभेच्छा देत आहे Indian Independence Day 2022 स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना अनेकांचा संभ्रम होत आहे तो दूर करणे फार महत्वाचे आहे
200 वर्षाहून अधिकचा संघर्ष 200 वर्षाहून प्रदीर्घ संघर्षानंतर भारताची ब्रिटिश राजवटीतून 15 ऑगस्टला मुक्तता झाली म्हणून आज आपण भारतीय या नात्याने स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा करू शकलो आहोत कारण या पृथ्वीच्या असंख्य सुपुत्रांनी आणि वीरांनी आपल्या रक्ताने स्वातंत्र्याला गवसणी घातली त्यांनी मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण केले पंतप्रधान मोदींनी 9व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले यावेळी त्यांनी सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले सर्व त्याग आणि बलिदानांना नतमस्तक होण्याची आज संधी आहे असे त्यांनी देशाला उद्देशून बोलताना सांगितले
पहिला वर्धापन दिन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला त्याला एक वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजेच १५ ऑगस्ट १९४८ रोजी स्वातंत्र्यदिनाचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला मात्र स्वातंत्र्यदिन हा दुसरा ठरला तो सुरू होणाऱ्या तारखेलाही दिवस मोजला जातो त्याचप्रमाणे 1957 मध्ये भारताने स्वातंत्र्य दिनाचा 10 वा वर्धापन दिन साजरा केला परंतू एक दिवस म्हणून तो 11 वा होता तशीच मोजणी करत आता 2022 हा स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन आहे पण तो दिवस 76 वा आहे म्हणजेच भारत यंदा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे
हेही वाचा Ambani family अँटिलिया प्रकरणानंतर पुन्हा अंबानी कुटुंबीयांना फोनवरून धमकी मुंबई पोलिसांचा तपास सुरू