हैदराबाद - 15 ऑगस्ट 2022 रोजी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील. हा स्वातंत्र्यदिन ( Independence Day 2022 ) खास बनवण्यासाठी देशात जय्यत तयारी सुरु आहे. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आझादी का अमृत महोत्सव' या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशाने साक्षरता दर, दरडोई उत्पन्न आणि अन्य बाबतीत केलेल्या प्रगतीबद्दल जाणून घेणार आहोत.
साक्षरता - मिळालेल्या माहितीनुसार, भारताची साक्षरता पातळी सुमारे 12 टक्के इतकी कमी होती. तेव्हापासून भारताने प्रशंसनीय प्रगती केली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार साक्षरता दर 74.37 टक्के आहे.
माध्यम स्वातंत्र - प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कुठे आहे? याबद्दल कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. तरी, उपलब्ध आकडेवारीनुसार, 180 देशांमध्ये भारत 142 व्या क्रमांकावर आहे.
दरडोई उत्पन्नाचा आकडा - 1940 आणि 1950 च्या दशकातील दरडोई उत्पन्नाचे आकडे अंदाजे 3.8 टक्के इतके कमी असल्याचा अंदाज आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 20 व्या शतकाच्या सुरूवातीस दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात गरीब देश असल्याचे नमूद केले होते. ताज्या आकडेवारीनुसार, दरडोई उत्पन्न 2,260 यूएस डॉलर आहे. दरडोई उत्पानामध्ये भारत 187 देशांमध्ये 145 व्या क्रमांकावर आहे.
अर्थव्यवस्था कामगिरी - ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जागतिक नाविन्यपूर्ण ट्रेंड इकोसिस्टम कामगिरी आणि अर्थव्यवस्थांच्या कामगिरीवर आधारित देशांची क्रमवारी लावली जाते. जेव्हा हा निर्देशांक पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आला तेव्हा 107 देशांमध्ये भारत 23 व्या क्रमाकांवर होता. ताज्या माहितीनुसार 130 देशांमध्ये आता भारत 46 क्रमाकांवर आहे.
हेही वाचा - Achievements75 क्रीडा क्षेत्रात भारत देशाची प्रतिमा उंचावलेल्या भारतीय महिला