ETV Bharat / bharat

IND Vs SL Final Match : भारतीय संघाकडून 'लंका पतन'; भारताचा 10 गडी राखून धडाकेबाज विजय, आशिया कपावर आठव्यांदा कोरलं नाव - श्रीलंका संघ 50 धावांवर ऑलआऊट

India vs Sri Lanka Live Score Asia Cup 2023 Update: शुभमन गिल, इशान किशन यांनी 51 धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिलाय. 51 धावाचा पाठलाग करतांना 6.1 षटकात, इशान किशननं 23 धावा केल्या तर, शुभमन गिलनं 27 धावा केल्या. श्रीलंकेनं भारताला 51 धावांचं लक्ष्य दिलं होतं.

IND Vs SL Final Match
IND Vs SL Final Match
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 3:10 PM IST

Updated : Sep 17, 2023, 9:47 PM IST

कोलंबो : आशिया कप 2023 चा अंतिम सामना भारत, श्रीलंका यांच्यात कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळण्यात आला श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी घेतलेला निर्णय त्यांना महागात पडलाय. श्रीलंकेचा संघ 15.2 षटकात 50 धावांवर बाद झालाय. मोहम्मद सिराजनं शानदार गोलंदाजी करत 6 बळी घेतले. तर श्रीलंकेच्या 5 खेळाडूना आपलं खातंही उघडता आलं नाहीय. दोनच फलंदाजांना यावेळी दुहेरी आकडा गाठता आला. कुसल मेंडिलनं सर्वाधिक १७ धावा केल्या, तर दुशान हेमंतानं १३ धावा केल्या. भारताकडून सिराजशिवाय हार्दिक पांड्यानं 3 बळी घेतले. जसप्रीत बुमराहनं 1 बळी घेतलाय.

आशिया कप 2023 मधील अनेक सामने रोमांचक झाले आहेत. भारत व श्रीलंकेतील अंतिम सामनादेखील अत्यंत रोमांचक होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, भारताच्या गोलंदाजापुढं श्रीलंकेच्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातल्यानं भारतानं सहजरित्या विजय मिळविला. रोमांचक सामना पाहण्याची प्रतिक्षा करणाऱ्या प्रेक्षकांची मात्र निराशा झालीय.केवळ सहा षटकात भारतानं 51 धावा करून सलग आठव्यांदा आशिया कप 2023 मिळविलाय. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील भारतीय संघाचं कौतुक केलयं.

  • "Well played Team India. Congratulations on winning the Asia Cup. Our players have shown remarkable skill throughout the tournament", tweets Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/qJ8ABHWaC6

    — ANI (@ANI) September 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • इशान, शुभमन गिलसोबत भारताची सुरवात : आशिया कपच्या फायनलमध्ये 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघासाठी इशान किशनने, शुभमन गिलसोबत डावाची सुरुवात केली होती.

श्रीलंकेचे 5 खेळाडू शून्यावर बाद : आज कोलंबोतील आर. प्रेमदास स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात श्रीलंकेच्या 5 खेळाडूना आपलं खातेही उघडता आला नाहीय. संघातील दोनच फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. कुसल मेंडिलनं सर्वाधिक 17 धावा केल्या, तर दशून हेमंतानं सर्वाधिक 13 धावा केल्या. भारताकडून सिराजशिवाय हार्दिक पांड्यानं 3 बळी घेतलेय. जसप्रीत बुमराहनं 1 बळी घेतला.

श्रीलंकेनं संघाची एकदिवसीय सामन्यात दुसरी सर्वात कमी धावसंख्या : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 50 धावांत ऑल आऊट केलं आहे. भारताला 51 धावांचे लक्ष्य मिळालं आहे. श्रीलंकेचा संघ वनडे क्रिकेटमधील दुसऱ्या सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाला आहे. यापूर्वी 2012 मध्ये श्रीलंकेचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 43 धावांत ऑलआऊट झाला होता. 1986 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध श्रीलंका संघ 55 धावांत ऑलआऊट झाला होता.

  • श्रीलंका संघ 50 धावांवर ऑलआऊट : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा संघ 50 धावांत ऑलआऊट झाला आहे. हार्दिक पंड्यानं 16 व्या षटकात सलग दोन विकेट घेत श्रीलंकेला ऑलआऊट केलं. मोहम्मद सिराजनं सर्वाधिक 6 बळी घेतले. हार्दिक पांड्याला तीन बळी मिळाले. जसप्रीत बुमराहनं एक विकेट घेतलीय.
  • हार्दिकनं श्रीलंकेला दिला 9 वा धक्का : आशिया चषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला 9 वा धक्का बसला. 16व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्यानं प्रमोद मदुसनला पॅव्हेलियनमध्ये पाठवलंं.
  • श्रीलंकेनं 15 व्या षटकात 50 धावांचा गाठला टप्पा : आशिया चषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेची धावसंख्या 50 पर्यंत पोहोचली होती. 15 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या 50 धावा होती.
  • हार्दिक पांड्यानं श्रीलंकेला दिला आठवा धक्का : 40 च्या स्कोअरवर श्रीलंकेची आठवी विकेट पडली. हार्दिक पांड्यानं दुनिथ वेलल्गेला (8) पॅव्हेलियनमध्ये पाठवलंय. 13व्या षटकात श्रीलंकेच्या संघाची अवस्था पाहता संघ 20 षटकंही टिकेल का नाही, असा प्रश्न निर्माण झाल्याचं दिसून आलं.
  • श्रीलंकेच्या 12 धावांवर सहा विकेट : श्रीलंकेला सहाव्या षटकात 12 धावांवर सहावा धक्का बसला. त्यानं तिसर्‍याच षटकात कर्णधार दासुन शनाकाला त्रिफळाचित करत तंबूत पाठवलं. कर्णधार दासुन शनाकाला यावेळी खातेही उघडता आलं नाही. सहा षटकांनंतर श्रीलंकेची धावसंख्या 8 विकेटवर 40 धावा झाल्या होत्या. त्यावेळी दुनिथ वेलाल्गे, हेमंथा सध्या क्रीजवर होते.

सिराजनं एका ओव्हरमध्ये घेतल्या चार विकेट : सिराजनं एका ओव्हरमध्ये चार विकेट घेऊन श्रीलंकेच्या फलंदाजांना शरणागती पत्करायला लावली. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिराजनं पथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केलं. निसांकाला 4 चेंडूत 2 धावा करता आल्या आहे. एका चेंडूनंतर सदीरा समरविक्रम शून्यावर तंबूत परतला. यानंतर पुढच्याच चेंडूवर चरित असलंकाला इशान किशनकरवी झेलबाद केलं. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर नवा फलंदाज धनंजय डी सिल्वानं चौकार ठोकला. त्यामुळं सिराजची हॅटट्रिक वाया गेली. मात्र सिराजनं शेवटच्या चेंडूवर डी सिल्वाला झेलबाद केलं.

भारतानं आठ वेळा जिंकला आशिया कप : भारत असा एकमेव संघ आहे, ज्यानं सर्वाधिक म्हणजे आठ वेळा आशिया कप जिंकला आहे. त्यानंतर श्रीलंकेनं 6 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. आहे. भारतानं शेवटची ट्रॉफी 2018 मध्ये जिंकली होती. त्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली भारतानं आशिया कप फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव केला होता. त्याच वेळी, दासुन शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ गतविजेता आहे.

  • भारत (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
  • श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन) : पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शानाका (क), दुनिथ वेलालेज, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथिशा पाथिराना.

हेही वाचा -

IND vs SL Asia Cup २०२३ : फायनल मॅचवर पावसाचं सावट, राखीव दिवशीही पाऊस आला तर काय?

Neeraj Chopra : नीरज चोप्राचं विजेतेपद थोडक्यात हुकलं, डायमंड लीग स्पर्धेत पटकावलं दुसरं स्थान

Asia Cup २०२३ : 'आयसीसी फक्‍त बकवास करते. यामुळे क्रिकेट...', श्रीलंकेचा विश्वविजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा भडकला

Last Updated : Sep 17, 2023, 9:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.