ETV Bharat / bharat

IND vs SA 3rd T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 'या' कारणामुळे खेळणार नाही विराट कोहली - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 मालिका

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेवर ( IND vs SA T20 Series ) कब्जा केला आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम टी-20 सामना मंगळवारी खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली खेळणार ( Virat Kohli will not play in last match ) आहे. विराट न खेळण्याचे काय आहे कारण, घ्या जाणून

Virat Kohli
विराट कोहली
author img

By

Published : Oct 4, 2022, 11:00 AM IST

इंदूर: मंगळवारी होळकर स्टेडियमवर ( Holkar Stadium Indore ) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात तिसरा अंतिम सामना ( IND vs SA 3rd T20 ) खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी एक मोठी अपडेट हाती आली आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Star Batsman Virat Kohli ) खेळणार नाही. त्याला या सामन्यातून विश्रांती देण्यात आली ( Virat Kohli was rested )आहे.

रविवारी गुवाहाटीमध्ये भारतीय संघाने मालिका जिंकल्यानंतर कोहली सोमवारी सकाळी मुंबईला रवाना झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI ) एका अधिकाऱ्याने सांगितले की, “त्याला (कोहलीला) अंतिम टी-20 सामन्यातून विश्रांती देण्यात आली ( Virat Kohli was rested ) आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ मुंबईला जाईल जिथे कोहली संघात सामील होईल. टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघ 6 ऑक्टोबरला मुंबईहून ऑस्ट्रेलियाला रवाना होणार ( Indian team will leave for Australia ) आहे. या माजी भारतीय कर्णधाराने रविवारी 28 चेंडूत नाबाद 49 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर भारताने हा सामना 16 धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

याआधी, वेस्ट इंडिजविरुद्ध कॅरेबियन देशांमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतून कोहलीला शेवटच्या वेळी विश्रांती देण्यात आली होती. त्यावेळी तो चांगल्या फॉर्ममध्ये नसल्यामुळे त्याला विश्रांती देण्यावर प्रश्न उपस्थित झाले होते.

कोहलीने नंतर कबूल केले की विश्रांतीच्या वेळी त्याने बॅटला हातही लावला नाही. विश्रांतीनंतर मात्र कोहलीने खूप चांगले पुनरागमन केले आणि आशिया चषकात काही सुरेख खेळी खेळल्या. दरम्यान, त्याने जवळपास तीन वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतकही झळकावले. दीपक हुडाच्या दुखापतीमुळे संघात घेतलेल्या श्रेयस अय्यरला ( Batsman Shreyas Iyer ) कोहलीच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. आशिया कपपासून ते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापर्यंत कोहलीने 10 डावात 404 धावा केल्या आणि त्याचा स्ट्राइक रेट 141.75 होता. दरम्यान, त्याने तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले.

हेही वाचा - Jasprit Bumrah Rulled Out T20 World Cup : टीम इंडियाच्या अपेक्षांना लागला सुरुंग; बुमराह टी-20 विश्वचषकातून झाला बाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.