बंगळुरु : येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात टी20 मालिकेतील पाचवा ( IND vs SA 5th T20 ) आणि शेवटचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
-
🚨 Toss Update 🚨
— BCCI (@BCCI) June 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
South Africa have elected to bowl against #TeamIndia in the fifth & final T20I of the series.
Follow the match ▶️ https://t.co/uAE094Srh7 #INDvSA | @Paytm pic.twitter.com/XjlFe4GMdo
">🚨 Toss Update 🚨
— BCCI (@BCCI) June 19, 2022
South Africa have elected to bowl against #TeamIndia in the fifth & final T20I of the series.
Follow the match ▶️ https://t.co/uAE094Srh7 #INDvSA | @Paytm pic.twitter.com/XjlFe4GMdo🚨 Toss Update 🚨
— BCCI (@BCCI) June 19, 2022
South Africa have elected to bowl against #TeamIndia in the fifth & final T20I of the series.
Follow the match ▶️ https://t.co/uAE094Srh7 #INDvSA | @Paytm pic.twitter.com/XjlFe4GMdo
भारतीय संघाचा कर्णधार रिषभ पंतने सलग पाचव्यांदा नाणेफेक गमावली ( Rishabh Pant lost toss fifth time ) आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने ( Keshav Maharaj captain of South Africa ) नाणेफेक जिंकली प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण मिळाले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघाचे दृष्टीने आजचा सामना अतिशय महत्वाचा आहे. कारण आज जो संघ सामना जिंकेल, तो संघ मालिका आपल्या नावे करेल. कारण सध्या मालिका 2-2 ने बरोबरीत आहे. म्हणून जो संघ आज सामना जिंकेल तो ट्रॉफीवर आपले नाव कोरेल.
-
🚨 Here are the #TeamIndia's & South Africa's Playing XIs 🔽
— BCCI (@BCCI) June 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Follow the match ▶️ https://t.co/uAE094Srh7 #INDvSA | @Paytm pic.twitter.com/qVbSg74sWD
">🚨 Here are the #TeamIndia's & South Africa's Playing XIs 🔽
— BCCI (@BCCI) June 19, 2022
Follow the match ▶️ https://t.co/uAE094Srh7 #INDvSA | @Paytm pic.twitter.com/qVbSg74sWD🚨 Here are the #TeamIndia's & South Africa's Playing XIs 🔽
— BCCI (@BCCI) June 19, 2022
Follow the match ▶️ https://t.co/uAE094Srh7 #INDvSA | @Paytm pic.twitter.com/qVbSg74sWD
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, केशव महाराज (कर्णधार), लुंगी एनगिडी आणि अॅनरिक नॉर्टजे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि आवेश खान.
हेही वाचा - IND vs SA 5th T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आज निर्णायक सामना; रिषभ पंतला असणार 'या' विक्रमाची संधी