ETV Bharat / bharat

IND vs ENG 3rd T20 : भारत आणि इंग्लंड संघात आज तिसरा सामना, इंग्लंडसमोर क्लीन स्वीप वाचवण्याचे आव्हान

भारत विरुद्ध इंग्लंड संघात टी-20 मालिकेतील शेवटचा आणि तिसरा ( IND vs ENG 3rd T20 ) सामना नॉटिंघम येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर सुरुवात होईल.

author img

By

Published : Jul 10, 2022, 3:06 PM IST

IND vs ENG
IND vs ENG

नॉटिंघम: शनिवारी भारत आणि इंग्लंड ( IND vs ENG ) संघात टी-20 मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर 49 धावांनी मात केली. त्यामुळे भारतीय संघाकडे 2-0 ने अशी विजयी आघाडी घेतली. तसेच या मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना आज (रविवारी) खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर सुरुवात होणार आहे.

तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघात काही बदल केले जाऊ शकतात. कारण भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. तरी देखील भारतीय संघाचा क्लीन स्वीप देण्याचा निर्धार असणार आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघाने मालिका गमावल्यानंतर शेवटचा आणि तिसरा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मागील दोन ही सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे इंग्लंड संघाला मालिका गमवावी लागली.

इंग्लंड संघाचा स्फोटक फलंदाज आणि कर्णधार जोस बटलरची ( Captain Jos Buttler ) बॅट या दोन सामन्यात थंडावली आहे. त्यामुळे दोन्ही सामन्यात इंग्लंड संघाला भारतीय लक्ष्याचा पाठलाग करताना अपयश आले आहे. त्याचबरोबर पहिल्या फळीतील इतरही फलंदाज त्यासाठी कारणीभूत आहेत. दुसरीकडे भारतीय फलंदाज आणि गोलंदाजी दोन्ही सुपरफॉर्ममध्ये आहेत.

संभाव्य इलेव्हन -

इंग्लंड: जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार), डेव्हिड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, हॅरी ब्रुक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, मॅट पार्किन्सन, डेव्हिड विली आणि रिचर्ड ग्लीसन.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (कीपर), रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल आणि युझवेंद्र चहल.

खेळपट्टी आणि हवामानाची माहिती -

ट्रेंट ब्रिजच्या खेळपट्टीवर उसळी दिसू शकते. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्यच म्हणता येईल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठी धावसंख्या उभारताना 180 च्या वर धावा करण्याचा विचार करावा लागेल. भारतीय वेळेनुसार रविवारी संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. हा सामना सोनी स्पोर्ट्स आणि सोनी लाइव्ह अॅपवर थेट पाहता येईल.

हेही वाचा - IND vs ENG 2nd T20 : इंग्लंडवर 49 धावांनी विजय मिळवत भारताने मालिकेवर केला कब्जा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.