ETV Bharat / bharat

IND vs AUS T20 Series : टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडिया मोठा झटका, शमीला कोरोणाची लागण 'या' खेळाडूला मिळणार संधी

मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर ( Mohammed shami ruled out of T20 Series ) पडला आहे. शमीला कोविड-19 चा फटका बसल्यामुळे, तो या मालिकेत भाग घेऊ शकणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी तो बरा होईल, अशी अपेक्षा आहे.

Mohammed shami
मोहम्मद शमी
author img

By

Published : Sep 18, 2022, 1:20 PM IST

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ( Fast bowler Mohammed Shami ) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला ( Mohammed shami ruled out of T20 Series ) आहे. मोहम्मद शमीला कोविड-19 चा फटका बसला आहे, कारण त्याला कोरोणाची लागण झाली ( Mohammed Shami covid19 test positive ) आहे. त्यामुळे तो या मालिकेत भाग घेऊ शकणार नाही. शमीच्या जागी उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी शमी बरा होण्याची शक्यता आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळवला जाणार आहे.

मोहम्मद शमीचा ( Mohammed Shami ) टी-20 विश्वचषक 2021 नंतर, शमीचा 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील परिस्थिती पाहता भारतीय निवड समितीने हा निर्णय घेतला आणि त्याआधी त्याला भारतातील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले. जेणेकरून त्याला संपूर्ण सामन्याचा सराव करता येईल. 2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा तो भारतासाठी टी-20 सामना खेळला असता, परंतु कोविडमुळे असे होऊ शकले नाही आणि सध्या तरी उमेश यादवला त्याच्या जागी संघात संधी मिळाली आहे.

34 वर्षीय उमेश यादवने ( Fast bowler Umesh Yadav ) भारतासाठी आतापर्यंत 7 टी-20 सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 9 विकेट घेतल्या आहेत. उमेश यादवने 24 फेब्रुवारी 2019 पासून भारतासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. त्याने आपला शेवटचा टी20 सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळला आणि त्याला कोणतेही यश मिळाले नाही. मात्र, उमेश यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह.

हेही वाचा - Anushka Emotional Post For Virat : विराटला मिस करत आहे अनुष्का, इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत दिले 'असे' कॅप्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.