ETV Bharat / bharat

IND vs AUS 2nd T20 : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवले 91 धावांचे लक्ष्य, रोहित शर्माने नोंदविला नवा विश्वविक्रम - Toss delayed due to wet outfield

भारत आणि ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS ) यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या ( IND vs AUS T20 Series ) मालिकेतील पहिला सामना आज नागपूर येथे खेळवला जाणार होता. परंतु ओल्या आउटफिल्डमुळे टॉसला ( Toss delayed due to wet outfield ) उशीर झाला आहे.

IND vs AUS
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
author img

By

Published : Sep 23, 2022, 7:35 PM IST

Updated : Sep 23, 2022, 10:55 PM IST

नागपूर : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने आठ षटकांमध्ये ९१ धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात विक्रम नोंदविला. त्यामुळे रोहित आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा क्रिकेटपटू ठरला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज नागपुरात खेळवला जात आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित आठ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात ९० धावा केल्या. भारतासमोर ९१ धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 20 चेंडूत 43 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार अॅरॉन फिंचने 31 धावा केल्या. या दोन खेळाडूंशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून अक्षर पटेलने दोन आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. दुसरीकडे कॅमेरून ग्रीनला विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी धावबाद केले. स्टीव्ह स्मिथला हर्षल पटेलने धावबाद केले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS ) संघात आज तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील ( IND vs AUS T20 Series ) दुसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ( Vidarbha Cricket Association Stadium ) खेळला जाणार आहे. या सामन्याला सातला सुरुवात होणार होती. परंतु ओल्या आउटफिल्डमुळे टॉसला ( Toss delayed due to wet outfield ) उशीर झाला आहे. त्यामुळे रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) आणि अॅरॉन फिंच ( Captain Aaron Finch ) या दोन कर्णधारांमध्ये आठला नाणेफेक पार पडली.

भारतीय संघ या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे हा सामना भारतीय संघासाठी खुप महत्वाचा आहे. भारतासाठी हा सामना 'करो या मरो' अशा स्वरुपाचा असणार आहे. हा सामना जिंकून भारत मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवेल.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 4 विकेट्सने भारतीय संघाचा धुरळा उडवला ( Australia defeated India by 4 wickets ). या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि हार्दिक पांड्याच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर, 6 गडी गमावून 208 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य सहज गाठले. त्याचबरोबर चौथ्यांदा भारताला त्यांच्याच मायदेशात पराभूत केले.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल/दीपक चहर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलियाची संभाव्य इलेव्हन: आरोन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड

हेही वाचा - Indw Vs Engw 3rd Odi : क्लीन स्वीप करून झुलनला संस्मरणीय निरोप देण्यासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात

Last Updated : Sep 23, 2022, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.