म्हैसूर : कर्नाटक राज्यात सध्या आयकर विभाग अतिशय सक्रिय आहे. विभागाने म्हैसूरमधील एका व्यावसायिकाच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. हा व्यापारी पुत्तूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचा भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी सायंकाळपासूनच त्याच्या ठिकाणांवर विभागाने छापे टाकण्यास सुरुवात केली. दरम्यान, पैशे मोठ्या हुशारीने लपून ठेवल्याचे समोर आले आहे. सध्या आयकर विभाग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच निवडणुक आयोगाने अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यामध्येही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटक निवडणुकीत पैशांसह अमली पदार्थांचाही वापर होत असल्याचे समोर आले आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी म्हैसूरमधील सुब्रमण्य राय यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. यावेळी संपूर्ण घराची झडती घेण्यात आली. बरीच चौकशी केल्यानंतर त्याच्या घरासमोरील सजावटीच्या वस्तूंच्या आत फळांच्या पेट्यांची तपासणी करण्यात आली, जिथून रक्कम जप्त करण्यात आली. छापेमारीत एक कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तपास अधिकाऱ्यांनी मंगळवार व बुधवारीही या प्रकरणातील पैसे व कागदपत्रांची तपासणी केली. या छाप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राज्यातील सर्व अवैध कामांवर नजर ठेवण्यात येत आहे : सुब्रमण्य रॉय हे म्हैसूरचे प्रसिद्ध मिठाई निर्माता आणि विक्रेते आहेत. यासोबतच त्यांचा रिअल इस्टेटचाही व्यवसाय आहे. बंगळुरूमधील सुमारे 20 आयटी अधिकाऱ्यांनी आज पहाटे 5 वाजता बॉम्बे टिफनीची दुकाने, घरे आणि कार्यालयांसह पाच ठिकाणी छापे टाकले आणि कागदपत्रांची तपासणी केली. राज्यात 10 मे रोजी विधानसभेची निवडणूक आहे. त्याची तयारी जोरात सुरू आहे. राज्यात निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. राज्यातील सर्व अवैध कामांवर नजर ठेवण्यात येत आहे. पोलीस चोरट्यांवर करडी नजर ठेवून आहेत.
हेही वाचा : Snowfall in Kedarnath: केदारनाथमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे भाविकांची मोठी अडचण