ETV Bharat / bharat

Delhi Crime News : श्रद्धा हत्याकांडासारख्या आणखी एका घटनेने हादरली दिल्ली, मृतदेहाचे तुकडे करून नदीकिनारी फेकले - महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले

दिल्लीत पुन्हा एकदा एका मृतदेहाचे तुकडे सापडल्यानंतर शहरात महिला सुरक्षेचे दावे फोल ठरल्याचे दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. दिल्लीत याआधीही अशी प्रकरणे समोर आली आहेत, ज्यांनी लोकांना हादरवून टाकले होते.

murder
हत्या
author img

By

Published : Jul 12, 2023, 5:07 PM IST

नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी राजधानी दिल्ली श्रद्धा वालकर हत्याकांडाने हादरली होती. आता दिल्लीतून पुन्हा एकदा असेच एक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीच्या गीता कॉलनी उड्डाणपुलाजवळ एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे पडले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस या प्रकरणी तातडीने तपासात गुंतले आहेत. शोधासाठी ड्रोनचाही वापर केला जात आहे. महिलेची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही.

दोन ठिकाणी मृतदेहाचे तुकडे सापडले : उत्तर जिल्ह्याचे डीसीपी सागर सिंह कलसी यांनी सांगितले की, यमुना खादर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. एफएसएल आणि गुन्हे पथक घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत. प्राथमिक तपासात मृत महिलेचे वय 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असल्याचे कळले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात तपास सुरू आहे.

  • #WATCH | Delhi police use a drone to conduct a search in the area after chopped body parts found near Delhi's Geeta Colony flyover

    Crime and forensics teams have been called. Case under section 302 is being registered. Search underway to collect evidence and further… https://t.co/C5stJpUwHj pic.twitter.com/ZcYxLTv84n

    — ANI (@ANI) July 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचा पोलिसांना सवाल : याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये त्यांनी विचारले की, ही महिला कोण आहे? आरोपीला कधी अटक करणार आहे? दिल्लीत एकामागून एक भीषण हत्या का होत आहेत, असा सवालही त्यांनी केला.

पोलिसांना घटनास्थळी दोन काळ्या पॉलिथिनच्या पिशव्या सापडल्या आहेत. त्यापैकी एका पॉलिथिनच्या पिशवीत मृतदेहाचे डोके तर दुसऱ्या पिशवीत शरीराचे इतर भाग होते. लांब केसांच्या आधारे मानले जात आहे की हे एका महिलेचे शरीर आहे. मात्र मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. पुढील तपास सुरू आहे. - परमादित्य, सहपोलीस आयुक्त, दिल्ली पोलीस सेंट्रल रेंज

  • दिल्ली के गीता कॉलोनी में महिला के शव के कई टुकड़े मिले हैं। पुलिस को नोटिस भेज रहे हैं। लड़की कौन थी? दोषी कब तक अरेस्ट होगा? एक के बाद एक भयानक मर्डर्र दिल्ली में क्यों हो रहे हैं?
    Total Collapse of Law & Order

    — Swati Maliwal (@SwatiJaiHind) July 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

श्रद्धा हत्याकांडाने देश हादरला होता : गेल्यावर्षी दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. श्रद्धाची हत्या तिचा प्रियकर आफताबने केल्याचा आरोप आहे. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले होते आणि हे तुकडे दिल्ली एनसीआरच्या आसपासच्या जंगलात फेकले होते. श्रद्धाच्या वडिलांनी तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर ही बाब उघडकीस आली होती. आश्चर्य म्हणजे, श्रद्धाच्या हत्येनंतर तब्बल 6 महिन्यांनी हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आफताबला अटक केली. सध्या आफताब तुरुंगात आहे.

हेही वाचा :

  1. Mira Road Murder: श्रद्धा वालकरपेक्षा भयानक सरस्वती वैद्य हत्याकांड, शंभरहून अधिक तुकडे शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.