ETV Bharat / bharat

Corona Cases in India : देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 866 नव्या रुग्णांची नोंद, 41 जणांचा मृत्यू

देशात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत ( Corona Cases in India ) आहेत. दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येपेक्षा ( Corona patients registered in india ) ही आकडेवारी कमी असली तरी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 866 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

corona patients registered in india
कोरोना रुग्णसंख्या भारत
author img

By

Published : Jul 25, 2022, 10:23 AM IST

हैदराबाद - देशात सध्या कोरोनाचे रुग्ण ( Corona Cases in India ) वाढत आहेत. दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येपेक्षा ही आकडेवारी कमी ( Corona patients registered in india ) असली तरी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 866 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 18 हजार 148 रुग्ण बरे झाले असून 41 लोकांनी आपला जीव ( Corona patients death india ) गमावला आहे. देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 50 हजार 877 असून पॉझिटिव्हिटी रेट हा 7.03 टक्के इतका आहे.

हेही वाचा - Arpita Mukherjee Car Accident : अर्पिता मुखर्जींच्या ताफ्याला कारची धडक, अपघातात किरकोळ जखमी

गेल्या 24 तासांत 16 हजार 866 नवे रुग्ण आढळल्याने देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 39 लाख 5 हजार 621 इतकी झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डेटातून पुढे आले आहे. तसेच, 41 रुग्णांचा मृत्यूने एकूण मृतांची संख्या ही 5 लाख 26 हजार 74 इतकी झाली आहे. कोरोना रुग्णसंख्येत केरळ आघाडीवर असून तेथे 2 हजार 21 नवे रुग्ण आढळले आहेत तर महाराष्ट्रत हा आकडा 2 हजार 15 इतका आहे.

महाराष्ट्रात 2 हजार 15 रुग्णांची नोंद - महाराष्ट्रात 2 हजार 15 नवे कोरोना रग्ण आढळल्याची माहिती काल समोर आली होती. 6 लोकांचा मृत्यू झाला असून रुग्णांची एकूण संख्या ही 82 लाखांच्या वर गेली आहे. तसेच, राज्यातील मृतांची संख्या ही 1 लाख 48 हजार 62 इतकी झाली आहे. 1 हजार 916 रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्यांची एकूण संख्या ही 78 लाखांच्या वर आहे. रिकवरी रेट 97.97 टक्के इतका आहे.

मुंबईत काल 238 नव्या रुग्णांची नोंद - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. काल २३८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २०१ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

२३८ नवे रुग्ण - काल २ मृत्यूंची नोंद झाली आहे. २७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २२ हजार ९१२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख १ हजार ४५५ रुग्ण बरे झाले आहेत. तर, १९ हजार ६४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ८१७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के, तर रुग्ण दुपटीचा कालावधी २ हजार ९५४ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत, झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२४ टक्के इतका आहे.

हेही वाचा - Kanwariyas protest: यमुनानगरमध्ये कारने धडक दिल्याने कावड धारकांनी कारवर काढला राग, मोडतोड करुन दिली पेटवून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.