ETV Bharat / bharat

विधानसभा निवडणुकीची तयारी; गोवा राज्यात सरकारी नोकरीची मेगाभरती सुरू - corruption in goa gov jobs recruitment

सरकारी नोकरी देतो म्हणून सांगून लोकांची लाखो रुपयांची लुबाडणूक करणाऱ्या १० पेक्षा अधिक लोकांच्या तक्रारी सरकारकडे नोंदी झाल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई चालू असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

गोवा राज्यात सरकारी नोकरीची मेगाभरती
गोवा राज्यात सरकारी नोकरीची मेगाभरती
author img

By

Published : Aug 24, 2021, 6:55 PM IST

Updated : Aug 24, 2021, 7:12 PM IST

पणजी - राज्यातील मतदारांना खुश करण्यासाठी गोवा सरकारने सरकारी नोकरीची मेगाभरती सुरू केली आहे. निवडणुकीपूर्वी राज्यात रिकामी असणाऱ्या विविध विभागाची पदे भरवून सरकार आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या नोकरभरतीत पारदर्शकता असल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे.

राज्यातील विविध शासकीय विभागात रिक्त असलेली पदे सरकारच्या वतीने भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात करण्यात येणाऱ्या या नोकरभरतीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्ष वेळोवेळी सरकारने काढलेल्या दहा हजार नोकऱ्यांवर प्रशचिन्ह उपस्थित करत सरकारवर या प्रकरणी आरोप करत आहे.

गोवा राज्यात सरकारी नोकरीची मेगाभरती सुरू

हेही वाचा-खाद्यतेल पुन्हा महागलं; तेलाच्या किंमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ

सरकारची नोकरभरतीमध्ये पारदर्शकता- मुख्यमंत्री
राज्यात निघालेल्या नोकरभरतीमध्ये अनेक एजंट उमेदवारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लुटण्याची प्रकरणे उघड झाली आहेत. राज्यात एजंटांच्या भूलथापांना बळी न पडता या नोकरभरतीमध्ये कोणाचाही वशिला चालत नाही. निव्वळ पारदर्शकपणे ही नोकरभरती प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-नारायण राणेंना अटक करणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला - भाजप प्रवक्ते संबित पात्रा

आतापर्यंत दहा एजंटवर कारवाई
सरकारी नोकरी देतो म्हणून सांगून लोकांची लाखो रुपयांची लुबाडणूक करणाऱ्या 10 पेक्षा अधिक लोकांच्या तक्रारी सरकारकडे नोंदी झाल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई चालू असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

हेही वाचा-जम्मू काश्मीर : सुरक्षा दलाकडून सोपोरेमध्ये तीन दहशतवाद्यांचा एन्काउन्टर; रेल्वेसह इंटरनेट सेवा स्थगित

दहा हजार सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन
सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यातील तरुणांना दहा हजार सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर विरोधी पक्षांनी टीकाही केली. मात्र येणाऱ्या काळात किती तरुण, तरुणींना नोकरी मिळते हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये विधानसभा निवडणुका-

गोव्यात भाजपने प्रत्येक मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह पक्षाच्या नेत्यानी राज्यातील विविध मतदारसंघाचे दौरे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यात मुदतपूर्व निवडणुका होणार का? असा प्रश्न एका बाजूने उपस्थित केला जात आहे. मात्र, गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यास साफ नकार देत निवडणुका फेब्रुवारी 2022 नंतरच होणार असल्याचे नुकतेच सांगितले आहे.

Last Updated : Aug 24, 2021, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.