ETV Bharat / bharat

कर्नाटकात पीडितेने 12 वर्षांपूर्वी झालेल्या बलात्काराची आता केली तक्रार, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

author img

By

Published : Jul 28, 2022, 1:04 PM IST

कर्नाटकात तब्बल 12 वर्षांनंतर एका बलात्कार पीडितेने ( Karnataka women complaint on rape after 12 years ) तिच्यावर चर्चमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा केला आहे. पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे, पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

बंगळुरू - कर्नाटकात तब्बल 12 वर्षांनंतर एका बलात्कार पीडितेने ( Karnataka women complaint on rape after 12 years ) तिच्यावर चर्चमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा केला आहे. पीडितेने पोलिसांत तक्रार ( Karnataka women rape ) दाखल केली आहे. त्यामुळे, पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 आरोपींपैकी 6 जणांवर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिपदासह पक्षीय पदांवरून हकालपट्टी करा, तृणमूल नेत्यांसह विरोधकांचीही मागणी

पोलिसांनी सांगितले की, ही घटना 2010 मध्ये बंगळुरूच्या विद्यारण्यपुरा भागातील कावेरी लेआऊटमधील एका चर्चमध्ये घडली होती. त्यावेळी पीडिता फक्त 6 वर्षांची होती, त्यानंतर तिचे आई-वडील तिला कामावर जाण्यापूर्वी चर्चमध्ये सोडायचे आणि कामावरून परतल्यानंतर ते तिला घेऊन जायचे. आरोपी सायमन पीटरने अश्लील फोटो दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या सर्व प्रकाराने त्रस्त झालेल्या पीडितेने चर्चमध्ये राहणाऱ्या सॅम्युअल डिसोझा यांना याबाबत सांगितले. त्यानंतर त्याने आरोपीला फटकारले आणि पीडितेला त्रास देऊ नका, असे बजावले.

फिर्यादीने पोलिसांना सांगितले की, सॅम्युअल डिसुझाने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि जवळपास 2 वर्षांपासून तिच्यावर बलात्कार केला. सततच्या लैंगिक छळानंतर पीडित मुलगी डिप्रेशनमध्ये गेली होती. सतत समुपदेशन आणि उपचारानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, सहा आरोपींना बलात्काराच्या घटनेची माहिती होती, तरीही त्यांनी प्रकरण लपविण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीचा आरोप आहे. आरोपींवर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायदा, सामूहिक बलात्कार आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया गांधींवर साधला निशाणा

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.