इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना अटक करण्यात आली आहे. मात्र त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. इमरान खान यांना तात्काळ सोडण्यात येण्याचे आदेशही पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे माजी पंतप्रधान इमरान खान आज सकाळी कडेकोट बंदोबस्तात अटकपूर्व जामिनासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात (IHC) हजर होणार आहेत. या प्रसंगी त्यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाने रॅलीची घोषणा केली आहे. त्यामुळे या रॅलीला इमरान खान संबोधित करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक : इमरान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. इमरान खान यांनी अल कादिर ट्रस्टमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या (एनएबी) आदेशानंतर अधिकाऱ्यांनी मरान खानला अटक केली आहे. विशेष म्हणजे इमरान खान इस्लामाबाद न्यायालयात असताना त्यांना अटक करण्यात आली.
न्यायालयाने अटक ठरवली बेकायदेशीर : माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेवर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी त्यांचा तुरुंगवास अवैध ठरवला. न्यायालयाच्या आतून कोणालाही अटक केली जाऊ शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. यावेळी पोलिसांनी इमरान खान यांना सर्वोच्च न्यायालयाच्या संरक्षणात ठेवण्याचे आदेश दिले. त्यासह शुक्रवारी सकाळी 11 वाजता उच्च न्यायालयात हजर करण्याचे निर्देश देत इमरान खान यांची तात्काळ सुटका सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
इमरान खान यांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्याचे आदेश : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इमरान खान यांची अटक बेकायदा असल्याचे ठरवले आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने इमरान खान यांच्या सुरक्षेची पुरेशी व्यवस्था करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. इमरान खान यांना त्यांच्या याचिकांवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश आज सकाळी सकाळी 11:00 वाजता याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयासमोर सादर करेपर्यंत वैध राहील. उच्च न्यायालयाने दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या अधीन असेल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -
1) Imran Khan Arrested: इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानवर काय परिणाम होणार? खास रिपोर्ट