इस्लामाबाद - पाकिस्तानच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी दावा केला आहे की इम्रान खान यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना बीएमडब्ल्यू एक्स 5 ही गाडी घेतली, जी मूळत: परदेशी शिष्टमंडळांसाठी पंतप्रधानांची कार होती. ( Maryam Aurangzeb ) डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, औरंगजेब म्हणाले की, पंतप्रधान कायद्यानुसारच कार आपल्या वापरात ठेवू शकतात. इम्रान खान आधीच परदेशातून मिळालेल्या भेटवस्तूंवर निशाणा साधत आहेत.
-
Imran Khan retained gifts from Tosha Khana as well as expensive #BMW vehicle worth Rs 150 million& a #pistol gifted by foreign dignitary was even not listed with Tosha Khana and Imran Khan retained that with him illegally: Information Minister @Marriyum_Ahttps://t.co/3AqMH4ys1C pic.twitter.com/FPaYsdnkJY
— Ministry of Information & Broadcasting (@MoIB_Official) May 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Imran Khan retained gifts from Tosha Khana as well as expensive #BMW vehicle worth Rs 150 million& a #pistol gifted by foreign dignitary was even not listed with Tosha Khana and Imran Khan retained that with him illegally: Information Minister @Marriyum_Ahttps://t.co/3AqMH4ys1C pic.twitter.com/FPaYsdnkJY
— Ministry of Information & Broadcasting (@MoIB_Official) May 1, 2022Imran Khan retained gifts from Tosha Khana as well as expensive #BMW vehicle worth Rs 150 million& a #pistol gifted by foreign dignitary was even not listed with Tosha Khana and Imran Khan retained that with him illegally: Information Minister @Marriyum_Ahttps://t.co/3AqMH4ys1C pic.twitter.com/FPaYsdnkJY
— Ministry of Information & Broadcasting (@MoIB_Official) May 1, 2022
मंत्री मरियम पुढे म्हणाल्या की, खान यांनी पंतप्रधानांच्या घरात महागड्या गाड्या असल्याबद्दल यापूर्वीच्या सरकारांवर टीका केली होती. तरीही त्यांनी आग्रह धरला आहे, की त्यांना कार ठेवायची आहे. असही त्या म्हणाल्या आहेत. (2016)मध्ये ही कार खरेदी केली गेली तेव्हा तिची किंमत 30 दशलक्ष पाकिस्तानी रुपये होती. (Imran Khan) जी आता 60 दशलक्ष पाकिस्तानी रुपये झाली आहे. बॉम्ब-प्रूफिंगसह ही गाडी बुलेट-प्रूफिंग आहे. या गाडीची किंमत आता सुमारे 150 दशलक्ष पाकिस्तानी रुपये आहे.
डॉनच्या वृत्तानुसार, मरियम औरंगजेब म्हणाल्या की, इम्रान खानने गिफ्ट रिटेन्शन टक्केवारी 20 टक्के कमी केली आणि नंतर ती 50 टक्के केली. मंत्र्याने सांगितले की, त्यानंतर खान यांची पत्नी बुशरा बीबीची जवळची मैत्रीण फराह खान यांच्याकडून भेटवस्तू खरेदी केल्या, जी पंजाबमधील प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी लाच घेऊन कोट्यवधी कमावत होती असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना असेही सांगितले की, दुसऱ्या देशाकडून काही भेटी मिळाल्या त्या सरकारी दरबारात जमा करण्याऐवजी खान यांनी ती बंदूक आपल्याकडेच ठेवली आहे. खान यांचा उल्लेख करत माहिती मंत्री म्हणाल्या, "तुम्ही चोर, फसवणूक करणारे, लबाड आणि फसवणूक करणारे आहात. परंतु, केवळ चुकीचे आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी स्वत:ला पवित्र माणूस म्हणून दाखवण्याचा तुमचा प्रयत्न आहे असही ते म्हणाले आहे.
हेही वाचा - LIC IPO Is Open : एलआयसी आयपीओसाठी आजपासून अर्ज करता येणार