मुंबई : आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) वाचा. आज धनत्रयोदशी, मोदींचा अयोध्या दौरा, नागपूरमध्ये भाजपचा दिवाळी मिलन कार्यक्रम, भारत जोडो यात्रा आज तेलंगणात, मुख्यमंत्र्यांचा आज रायगड दौरा, उद्धव ठाकरेंचा आज औरंगाबाद दौरा या विशेष घडामोडी आहेत.
आज नागपूरमध्ये भाजपचा दिवाळी मिलन कार्यक्रम (BJP Diwali Milan program in Nagpur) : भाजप कार्यकर्त्यांच्या दिवाळी मिलन कार्यक्रमाला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत, भट सभागृह, संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम होईल.
आज धनत्रयोदशी ( Diwali 2022) : आज धन्वंतरी जयंतीला भगवान धन्वंतरीची पूजा केली जाईल. 23 तारखेला दिवसभर सर्वार्थसिद्धी योग राहील. त्यामुळे सर्व प्रकारची खरेदी, गुंतवणूक आणि नवीन सुरुवात करण्यासाठी संपूर्ण दिवस शुभ आहे.
पंतप्रधान मोदींचा आज अयोध्या दौरा (PM Modi Ayodhya visit ) : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी पाच वाजता मोदी अयोध्येत प्रभू रामाचं दर्शन घेतील आणि पूजा करतील. संध्याकाळी ५.४५ वाजता श्रीरामाचा राज्याभिषेक पार पडणार आहे.
मुख्यमंत्र्यांचा आज रायगड दौरा (CM Eknath Shinde Raigad visit today) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रायगडमध्ये विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
भारत जोडो यात्रा आज तेलंगणात (Bharat Jodo Yatra) : आज भारत जोडो यात्रा तेलंगणात दाखल होणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' आज सकाळी कर्नाटकातील रायचूरहून तेलंगणातील गुडेबेलूरमध्ये दाखल होणार आहे.
उद्धव ठाकरेंचा आज औरंगाबाद दौरा (Uddhav Thackeray Aurangabad visit today) :उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. ते आज औरंगाबादमधील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.