ETV Bharat / bharat

Today Top News : आजच्या महत्त्वाच्या ठळक घडामोडी; वाचा एका क्लिकवर - News stories

देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. (News stories of national and local importance )

Top News
ठळक घडामोडी
author img

By

Published : Oct 12, 2022, 7:51 AM IST

देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. (News stories of national and local importance )

1) SBI PO Recruitment 2022: स्टेट बँकेत नोकरीची आजची शेवटची संधी : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक खूशखबर आहे. देशातील सर्वांत मोठ्या सरकारी बँकेने म्हणजेच एसबीआयने भरती काढली आहे. ही भरती पीओ म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसरपदासाठी असून, देशभरातून दीड हजारांपेक्षा जास्त उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार वेळ न घालवता बँकेची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

2)BCCI Election : रॉजर बिन्नी बिनविरोध BCCI अध्यक्ष होणार; राजीव शुक्लांनीच दिले संकेत : बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे. याचे संकेत सध्याचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मंगळवारी (दि. 11 ) रोजी दिले. एएनआयने केलेल्या ट्विटनुसार राजीव शुक्ला यांनी सांगितले की, 'मी बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदासाठी, रॉजर बिन्नी यांनी अध्यक्षपदासाठी, जय शहा यांनी सचिव पदासाठी आणि आशिष शेलार यांनी खजानीस पदासाठी अर्ज दाखल केला आहे. सध्याच्या घडीला तरी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

3)शेतकऱ्यांच्या खात्यावर या दिवशी होणार 12 वा हप्ता जमा : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी भारत सरकार विविध योजना राबवत आहे. या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जात आहे. आतापर्यंत एकूण 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. त्याच वेळी, भारत सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 12 व्या हप्त्याचे पैसे देखील पाठवू शकते. अशा परस्थितीत देशभरातील अनेक शेतकरी 11 व्या हप्त्याचे पैसे मिळाल्यानंतर 12 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार ऑक्टोबर महिन्यात कोणत्याही तारखेला 12 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकते. याआधी सप्टेंबरच्या शेवटच्या तारखेला हप्त्याची रक्कम हस्तांतरित केली जाईल, असे सांगितले जात होते. स्थिती तपासण्यासाठी, तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. वेबसाइट उघडल्यानंतर तुम्हाला शेतकरी कोपऱ्यातील लाभार्थी स्थितीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ही प्रक्रिया केल्यानंतर, तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक निवडावा लागेल. आता तुम्हाला कॅप्चा कोड टाकून जनरेट OTP चा पर्याय निवडावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही हप्त्याची स्थिती सहज तपासू शकता.

4)शिवसेनेचा आणखी एक नेता अडचणीत, वैभव नाईक यांची ACB कडून चौकशी, 8 दिवसांचा दिला वेळ : आर्थिक व्यवहाराप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणखी एक नेता अडचणीत सापडला आहे. सिंधुदुर्गमधील उद्धव ठाकरेंच्या गोटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने चौकशी केली. तब्बल अर्धा तास एसीबीने चौकशी केली. त्यानंतर 20 वर्षांतील उत्पन्नाचा हिशोब देण्यासाठी वैभव नाईक यांना आठ दिवसांचा वेळ दिला आहे. कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांची शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्या कडून चौकशी झाली. साधरणपणे अर्धा तास वैभव नाईक यांची चौकशी करण्यात आली. एसीबीने वैभव नाईक यांना 2002 ते 2022 या कालावधीतील उत्पनाची चौकशी केली. त्याशिया याचा तपशील देण्यासाठी वैभव नाईक यांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आठ दिवसांत सर्व माहिती देण्याचे आदेश एसीबीने वैभव नाईक यांना दिले आहेत.

5) पैठणी साडीची परंपरा जपणारा 31 वा न्यू वेव्ह पैठणी फेस्टिव 12 ते 16 ऑक्टोंबर दरम्यान सुरू : वर्षानुवर्षे उत्पादन केंद्र असलेल्या येवला शहराचा व्यापार ठप्प झाला आणि म्हणूनच अस्सल पैठणी साडी ग्राहकांनपर्यंत पोचवण्यासाठी दोन वर्षांच्या कालावधीनंतर पैठणीची वैभवशाली परंपरा पुन्हा साजरा करण्याचे वचन जपत ३१ व्या ''न्यू वेव्ह पैठणी फेस्टिव्हल'' ला सुरुवात होत आहे. सर्वात जुन्या आणि प्रख्यात अश्या ३१ वे ''न्यू वेव्ह पैठणी फेस्टिवला'' ह्या वर्षी दिनांक १२ ऑक्टोंबर २०२२ ते १६ ऑक्टोंबर २०२२ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, दादर येथे सुरु होणार आहे. फेस्टिवल मध्ये ग्राहकांना १०० वेगवेगळ्या प्रकारच्या पैठण्या पाहायला मिळतील. ह्या सगळ्या पैठण्या अस्सल दर्जाच्या असून त्यांची किंमत १५००० हजार पासून ते ३.५ लाख पर्यंत असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.