राज्यात अवकाळी पावसाचे संकट
पुढील चार दिवस मध्य भारतासह राज्यात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही दिवसांपूर्वी काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता पुन्हा आगामी 4 दिवस मुंबई-कोकणसह राज्यातील सर्वच भागात सोसाट्याच्या वार्यासोबत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
![राज्यात अवकाळी पावसाचे संकट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11538018_rain.jpg)
दिल्लीत आणखी एक आठवडा लॉकडाऊन वाढवला
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन, आणखी एक आठवडाभर लॉकडाऊन वाढवला आहे. आधी जाहीर केलेला लॉकडाऊन आज संपत आहे. मात्र, दिल्लीतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आणखी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
![दिल्लीत आणखी एक आठवडा लॉकडाऊन वाढवला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11538018_delhi-lock.jpg)
पंश्चिम बंगालमध्ये आज 7 व्या टप्प्यातील मतदान
पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार आहे. ४३ विधानसभा जागांवर मतदान पार पडणार आहे. यामध्ये 284 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहे.
![पंश्चिम बंगालमध्ये आज 7 व्या टप्प्यातील मतदान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11538018_up-woting.jpg)
उत्तर प्रदेशात आज 20 जिल्ह्यांमध्ये पंचायत निवडणुकीसाठी मतदान
उत्तर प्रदेशात आज 20 जिल्ह्यांमध्ये पंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात सुमारे साडेतीन लाख उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे.
![उत्तर प्रदेशात आज 20 जिल्ह्यांमध्ये पंचायत निवडणुकीसाठी मतदान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11538018_p-bangal.jpg)
महाराष्ट्रातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस मिळणार मोफत
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकाचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. टेंडर काढून लसीकरण करण्यात येणार असून सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे
![महाराष्ट्रातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस मिळणार मोफत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11538018_vaccine.jpg)
आयपीएलमध्ये आज पंजाब वि. कोलकाता सामना
आयपीएलमधील 21 व्या सामन्यात पंजाब किंग्ज विरोधात कोलकाता नाईट रायडर्स सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.
![आयपीएलमध्ये आज पंजाब वि. कोलकाता सामना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11538018_ipl.jpg)