ETV Bharat / bharat

NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर - आजच्या घडामोडी

या घडामोडींवर असणार खास नजर

newstoday
newstoday
author img

By

Published : Jul 29, 2021, 6:42 AM IST

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱयाचा आज दुसरा दिवस

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुण्यातील मनसे शाखाप्रमुखांसोबत ते चर्चा करत आहेत. राज ठाकरे यांच्या पुणे दौऱयाचा आज दुसरा दिवस आहे. राज हे आज बाबासाहेब पुरंदरे यांनादेखील भेटणार आहेत.

  • अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर

नाशिक - मनसेचे नेते व राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. पक्ष बांधणीसाठी अमित ठाकरे आता ग्राऊंडवर उतरले असल्याची चर्चा आहे. येत्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील अमित ठाकरे हे आज नाशिकमधील मनसे पदाथिकाऱ्यांसोबत बैठक करणार आहेत.

  • मुख्यमंत्री ठाकरेंचा आजचा कोल्हापूर पूरस्थिती पाहणी दौरा रद्द

कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या कोल्हापूरमधील पूरस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा घेण्यासाठी आज दौऱ्यावर जाणार होते. मात्र, कोल्हापूरला रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

  • देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आज कोल्हापूर पूरस्थितीची करणार पाहणी

कोल्हापूर - मागील आठवड्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली होती. या स्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत.

  • गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस

पणजी - राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात राज्य सरकारला खाण बंदी, महापूर यासह राज्यातील विविध प्रश्नावर पूर्णतः घेरण्याचा डाव विरोधी पक्षाने रचला आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.

  • ममता बॅनर्जीच्या दिल्ली दौऱ्याचा आज चौथा दिवस

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मागील तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. त्या आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. तसेच जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांच्यासोबत देखील ममता बॅनर्जी आज चर्चा करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.