- पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर
सातारा - राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यात अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील मोरगिरी, आंबेघर, हुंबरळी तालुक्यात महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
- राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर
पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. पुणे पालिकेच्या निवडणुकीवरही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
- पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी प्रविण दरेकर आज सातारा जिल्ह्यात
सातारा - मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका सातारा जिल्ह्याला बसला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज सातारा जिल्ह्यात येत आहेत.
- आजपासून गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू
गोवा - आजपासून गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात राज्य सरकारला खाण बंदी, महापूर यासह राज्यातील विविध प्रश्नावर पूर्णतः घेरण्याचा डाव विरोधी पक्षाने रचला आहे. सरकारही पूर्ण क्षमतेने या अधिवेशनाला सामोरे जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले.
- बसवराज बोम्माई आज घेणार कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
बंगळुरू - भाजप सरकारने दोन वर्षे कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी खांदेपालट केला आहे. मुख्यमंत्रिपदाचा बी. एस. येडियुराप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. बसवराज बोम्माई यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली आहे. बोम्माई हे आज सकाळी 11 वाजता राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
- रद्द झालेला भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी - 20 सामना आज होणार
कोलंबो - भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना भारतीय संघाचा अष्टपैलू कृणाल पांड्या याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे रद्द करण्यात आला होता. हा टी -20 सामना आज संध्याकाळी 8 वाजता खेळवला जाणार आहे.