- 1) दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 64 वा दिवसदिल्ली शेतकरी आंदोलन
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱयांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज 64 वा दिवस आहे. तीन कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेण्याची प्रमुख मागणी या शेतकऱयांची आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी 26 जानेवारीला शेतकऱयांनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडचे आयोजन केले होते. याला हिंसक वळण लागले होते.
- 2) आजपासून गडचिरोली येथून 'राष्ट्रवादी परिवार संवाद' दौऱयाला सुरुवात'राष्ट्रवादी परिवार संवाद' दौऱयाला सुरुवात
आजपासून (28 जानेवारी) 'राष्ट्रवादी परिवार संवाद' दौऱ्याला विदर्भातील नक्षलग्रस्त जिल्ह्यातून सुरुवात होणार आहे. हा संवाद दौरा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून सुरू होणार आहे. 3 हजार किलोमीटरचा दौरा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी दिली.
- 3) मराठा क्रांती ठोक मोर्चाची आज औरंगाबादेत पत्रकार परिषदमराठा क्रांती मोर्चा
मराठा क्रांती ठोक मोर्चाची आज पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी अकरा वाजता औरंगाबादमधील क्रांतिचौक येथे ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
- 4) शिवसेनेचे नेते धवलसिंह मोहिते पाटील यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश धवलसिंह मोहिते पाटील
शिवसेनेचे नेते धवलसिंह मोहिते पाटील यांनी सेनेला रामराम ठोकत काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. धवलसिंह मोहिते पाटील हे आज दुपारी 3 वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
- 5) विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या 'वार्षिक कामाचा लेखाजोखा' या पुस्तकाचे आज प्रकाशनविरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या 'वार्षिक कामाचा लेखाजोखा' या पुस्तकाचे आज प्रकाशन होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
- 6) मुंबई पालिकेच्या हेरिटेज वॉकचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार उद्घाटनमुंबई पालिका
मुंबई पालिकेत हेरिटेज वॉक ही संकल्पना राबवली जात आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
- 7) सांबरकुंड धरणाची जन सुनावणी आजसांबरकुंड धरण
अलिबाग तालुक्यातील रामराज भागातील 40 वर्षापासून रखडलेला साबरकुंड मध्यम धरण प्रकल्प अद्यापही कागदावरच राहिलेला आहे. खैरवाडी, जांबुलवाडी आणि महान हा परिसर धरणाच्या पाण्याखाली बुडीत क्षेत्र म्हणून घोषित आहे. त्याबाबतची जन सुनावणी आज होणार आहे.
- 8) आज जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत सरपंच पदाची सोडत
जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज सुटणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडूण आलेल्या प्रतिनिधींसोबतच कार्यकर्त्यांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे.
- 9) राष्ट्रवादीचा आज जनता दरबारराष्ट्रवादी
राष्ट्रवादीचा आज मुंबईत जनता दरबार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
- 10) धुळे जिल्ह्यातील सरपंच पदासाठीची सोडत आज सरपंच पदाची सोडत
धुळे जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आज संबंधित तहसील कार्यालयात आरक्षण सोडत सुटणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे.