ETV Bharat / bharat

अफगाणिस्तानातील भारतीयांना तातडीने मायदेशात आणा, सरकारचे कंपन्यांना निर्देश - भारतीय

युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील दिवसेंदिवस चिघळत चाललेली स्थिती पाहता इथे काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना तातडीने मायदेशी आणण्याचे निर्देश सरकारने कंपन्यांना दिले आहेत. अफगाणिस्तानात काम करणाऱ्या भारतीयांनीही आपल्या कंपन्यांना देशात परत जाण्याची सोय करून देण्याची विनंती करावी अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. संघर्षग्रस्त अफगाणिस्तानात दिवसेंदिवस तालिबानचे वर्चस्व वाढत असून इथे संघर्षात हजारो नागरिकांचा बळी गेला आहे.

अफगाणिस्तानातील भारतीयांना तातडीने मायदेशात आणा, सरकारचे कंपन्यांना निर्देश

author img

By

Published : Aug 10, 2021, 6:10 PM IST

Updated : Aug 10, 2021, 6:59 PM IST

नवी दिल्ली : युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील दिवसेंदिवस चिघळत चाललेली स्थिती पाहता इथे काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना तातडीने मायदेशी आणण्याचे निर्देश सरकारने कंपन्यांना दिले आहेत. याशिवाय मझार-ए-शरीफ इथून भारतीयांना घेऊन एक विशेष विमान मंगळवारी सायंकाळी राजधानी नवी दिल्लीच्या दिशेने उड्डाण करणार आहे. संघर्षग्रस्त अफगाणिस्तानात दिवसेंदिवस तालिबानचे वर्चस्व वाढत असून इथे संघर्षात हजारो नागरिकांचा बळी गेला आहे.

भारतीयांना तातडीने मायदेशात आणा

अफगाणिस्तानातून हवाई प्रवास बंद होण्यापूर्वी तिथल्या प्रोजेक्ट साईटवर काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना तातडीने मायदेशात आणावे असे निर्देश सरकारने अफगाणिस्तानात काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांना दिले आहेत. अफगाणिस्तानात काम करणाऱ्या भारतीयांनीही आपल्या कंपन्यांना देशात परत जाण्याची सोय करून देण्याची विनंती करावी अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.

मझार-ए-शरीफमधून भारतीयांना घेऊन येणार विशेष विमान

अफगाणिस्तानातील मझार-ए-शरीफ इथून भारतीयांना घेऊन एक विशेष विमान मंगळवारी सायंकाळी राजधानी नवी दिल्लीच्या दिशेने उड्डाण करणार आहे. ज्या भारतीयांना यातून यायचे असेल त्यांनी तातडीने आपले पूर्ण नाव, पासपोर्ट क्रमांक आणि त्याची शेवटची तारीख 0785891303, 0785891301 या दोन व्हाटस्अॅप क्रमांकांवर पाठवावी असे आवाहनही भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे.

अफगाणिस्तानातील स्थिती चिघळली

अमेरिकेने सैन्य माघारीचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. तालिबानने आतापर्यंत अफगाणिस्तानातील पाच प्रांतांच्या राजधानीवर ताबा मिळविला आहे. अमेरिकेचे सैन्य 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून माघार घेणार आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातील संघर्ष सातत्याने वाढतच चालला आहे. गेल्या महिनाभरात इथे संघर्षात हजारहून अधिक नागरिकांचा बळी गेल्याचे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार शाखेच्या प्रमुखांनी म्हटले आहे.

हे युद्ध आता अफगाणिस्तानचे

पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'हे युद्ध आता अफगाणिस्तानचे आहे. हा त्यांचा देश आहे. त्यामुळे त्यांनी काय करावे वा काय करू नये हा त्यांचा निर्णय आहे'. अफगाणिस्तानातील युद्ध हे स्पष्टपणे योग्य दिशेने जात नाहीये असेही त्यांनी म्हटले आहे. तालिबानने आणखी काही प्रांतांवर ताबा मिळविल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानपासून अंतर घेतल्याचेच यावरून दिसत आहे.

31 ऑगस्टपर्यंत अमेरिकन सैन्य घेणार माघार

अफगाणिस्तानातून माघार घेण्यासाठी अमेरिकेला केवळ तीन आठवडे आणि एक दिवसांचा कालावधी उरलेला आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून माघार घेत असतानाच तालिबानचा अफगाणिस्तानातील प्रभाव वाढत असून आतापर्यंत पाच प्रांतांच्या राजधानींवर तालिबानने ताबा मिळविला आहे. 31 ऑगस्टनंतर अमेरिकेकडून हवाई हल्ले सुरूच राहतील की नाही यावर बोलण्यास किर्बी यांनी नकार दिला आहे.

माघार घेण्यावर बायडेन प्रशासन ठाम

अफगाणिस्तानात तालिबानचा प्रभाव वाढत असला तरी अफगाणिस्तानातून या महिन्याच्या अखेरपर्यंत माघार घेण्यावर बायडेन प्रशासन ठाम असल्याचे व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. दरम्यान, 2001 मध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर तालिबान्यांना अफगाणिस्तानच्या सत्तेतून बाहेर काढण्यात आले होते.

स्थितीवर युएन मानवाधिकार प्रमुखांकडून चिंता

अफगाणिस्तानातील स्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करतानाच इथे शस्त्रसंधीची मागणी संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार प्रमुखांनी केली आहे. अफगाणिस्तानातील संघर्षातून वाचलेल्या महिला आणि मानवाधिकारांविषयी अतिशय चिंतीत असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आणि आपत्कालीन मदत समन्वयक शाखेच्या मार्टीन ग्रिफीथ यांनी म्हटले आहे. गेल्या महिनाभरातच अफगाणिस्तानातील संघर्षात एक हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

तालिबानची आश्रयस्थळे बंद करा, अमेरिकेच्या पाकला सूचना

अफगाणिस्तानातील संघर्षाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टीन यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पाकिस्तानने अफगाण सीमेनजिकची तालिबानची आश्रयस्थळे बंद करण्याची गरज व्यक्त केली. या आश्रयस्थळांमधूनच अफगाणिस्तानात असुरक्षितता आणि अस्थिरता निर्णाण होत असल्याचे पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले.

हेही वाचा - "हे युद्ध आता अफगाणिस्तानचे आहे", पेंटागॉनची तालिबानवर हवाई हल्ले न करण्याची भूमिका

Last Updated : Aug 10, 2021, 6:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.