ETV Bharat / bharat

Rahul Gandhi Disqualified : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'लढत राहणार', तर प्रियंका गांधीही आक्रमक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यानंतर राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यापुढे आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे राहुल म्हणाले. सदस्यत्व रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Mar 24, 2023, 9:44 PM IST

Updated : Mar 24, 2023, 10:04 PM IST

नवी दिल्ली : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे विविध राज्यातील नेते याप्रकरणी भाजपला जबाबदार धरत आहेत. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या आवाजासाठी लढत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी मी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

  • मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं।

    मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं।

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) March 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

खासदारकी रद्द - राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निव़डून आले होते. 2019 मध्ये कर्नाटकमधील भाषणादरम्यान त्यांनी मोदी आडनावावर भाष्य केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोकसभा सचिवालयाने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्या अपात्रतेचा आदेश 23 मार्चपासून लागू होणार आहे. राहुल गांधी यांना 102(1) अंतर्गत अपात्र ठरविण्यात आल्याचेही या अधिसूचनेत म्हटले आहे. यासोबतच लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 8 देखील नमूद करण्यात आले आहे.

प्रियंका गांधी, शरद पवारांची प्रतिक्रिया - राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर शरद पवार, प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. आपले संविधान वाचवण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे शरद पवार म्हणाले, तर प्रियंका गांधी यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह सर्वच भाजप नेते रोजच गांधी परिवाराबद्दल बोलत आहेत. माझ्या भावाने अदानी विषय लोकसभेत मांडल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप सरकार आम्हाला घाबरत असल्याचेही प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या.

काय आहे प्रकरण - लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी करून राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. याआधी गुरुवारी सुरत येथील न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. हे संपूर्ण प्रकरण बदनामीशी संबंधित आहे. राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पूर्णेश मोदी नावाच्या भाजप नेत्याने हा गुन्हा दाखल केला होता. पूर्णैश हे भाजपचे आमदारही राहिले आहेत.

  • The disqualification of Mr Rahul Gandhi and Mr Faizal a few months ago as MP’s of the Lok Sabha are against the basic tenets of the constitution, where democratic values are being curtailed. This is condemnable and against the very principles on which the constitution is based.

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) March 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेसचा भाजपवर आरोप - राहुल गांधी यांच्याविरोधात पूर्णेश मोदी यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून हे प्रकरण जाणूनबुजून उघडल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलतात आणि त्यांना प्रश्न विचारतात. पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना संसदेत उत्तर दिले नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. त्यांनी अदानीसोबतच्या संबंधांवर काहीही सांगितलेले नाही. राहुल गांधींनी मोदी-अदानींवर प्रश्न विचारल्यामुळे राहुल गांधींना धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

हेही वाचा - Rahul Gandhi Disqualified : इंदिरा गांधींचेही सदस्यत्व रद्द करून तुरुंगात पाठवले होते; जाणून घ्या काय होता घटनाक्रम?

Last Updated : Mar 24, 2023, 10:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.