नवी दिल्ली Illegal Betting App Ban : केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि प्रसारण मंत्रालयानं महादेव अॅपसह 22 बेकायदेशीर सट्टेबाजी अॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश जारी करत सट्टेबाजीच्या बाजारावर सर्जिकल स्ट्राईक केलंय. बेकायदेशीर सट्टेबाजी अॅप सिंडिकेटच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या तपासानंतर आणि छत्तीसगडमधील महादेव बुकवर त्यानंतरच्या छाप्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय. महादेव बुकचा मालक सध्या कोठडीत आहे. त्याला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) कलम 19 अंतर्गत मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आलीय.
22 बेकायदेशीर अॅप्स-वेबसाइट्स ब्लॉक : ईडीच्या विनंतीवरून केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि प्रसारण मंत्रालयानं महादेव अॅपसह 22 अॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत. छत्तीसगड सरकारला आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत वेबसाइट बंद करण्याची शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्हाला ईडीकडून शिफारस मिळाल्यानंतर ही ब्लॉकची कारवाई करण्यात आल्याचं केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले.
-
Ministry of Electronics and Information Technology (MeitY) has issued blocking orders against 22 illegal betting apps & websites, including Mahadev Book and Reddyannaprestopro. The action follows investigations conducted by ED against illegal betting app syndicate and subsequent… pic.twitter.com/WpnxS6u3Be
— ANI (@ANI) November 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ministry of Electronics and Information Technology (MeitY) has issued blocking orders against 22 illegal betting apps & websites, including Mahadev Book and Reddyannaprestopro. The action follows investigations conducted by ED against illegal betting app syndicate and subsequent… pic.twitter.com/WpnxS6u3Be
— ANI (@ANI) November 5, 2023Ministry of Electronics and Information Technology (MeitY) has issued blocking orders against 22 illegal betting apps & websites, including Mahadev Book and Reddyannaprestopro. The action follows investigations conducted by ED against illegal betting app syndicate and subsequent… pic.twitter.com/WpnxS6u3Be
— ANI (@ANI) November 5, 2023
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं (MeitY) महादेव बुक आणि रेड्डीअन्ना प्रिस्टोप्रो यासह 22 बेकायदेशीर बेटिंग अॅप्स आणि वेबसाइट्सच्या विरोधात ब्लॉकिंग ऑर्डर जारी केले आहेत. बेकायदेशीर बेटिंग अॅप सिंडिकेट विरुद्ध अंमलबजावणी संचालनालयानं (ED) केलेल्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. छत्तीसगडमधील महादेव बुकवर छापा टाकल्यानंतर अनेक खुलासे झाले आहेत, ज्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. - राजीव चंद्रशेखर इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री
- कोरोना महामारीनंतर व्यवसाय वाढला : काही महिन्यांतच देशभरातील 12 लाखांहून अधिक लोक महादेव बुक या अॅपमध्ये सामील झाले होते. लोकांनी क्रिकेटपासून निवडणुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सट्टा लावण्यासाठी या अॅपचा वापर करण्यास सुरुवात केली होती. इतकंच नाही तर कोरोना महामारीनंतर या अॅपचा व्यवसाय खूप वेगानं वाढला होता.
- मोठ्या प्रमाणात सट्टेबाजीचे अॅप्स : क्रिकेट आणि इतर खेळावर सट्टा लावण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात अॅप्स आले आहेत. दिवसेंदिवस अशा प्रकारच्या अॅप्सची संख्या वाढतच आहे. यामुळं लोक मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यासाठी याचा वापर करत आहेत.
हेही वाचा :