मुंबई : बीटेकचा विद्यार्थी दर्शन सोळंकी हा अहमदाबादचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याने तीन महिन्यांपूर्वी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. तसेच, शनिवारी त्याची पहिल्या सत्राची परीक्षा संपली होती. अभ्यासाच्या दबावाखाली विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलले का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न पवई पोलीस करत आहेत. यामध्ये पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली असून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नसल्यामुळे या प्रकरणात नक्की काय झाले याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच, परिक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने तोही एक धागा यामध्ये आहे. दरम्यान, कॅम्पसमधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांशी भेदभाव केल्यामुळे त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप एका विद्यार्थी गटाने केला असल्याने या प्रकरणाला आता जातीय वळण लागण्याची शक्यता आहे.
आयआयटी बॉम्बेने ट्विट : आयआयटीच्या विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक सुभाषिस चौधरी यांनी विद्यार्थ्यांना नोट लिहली आहे. आज दुपारी झालेल्या एका दुःखद घटनेत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती देताना आम्हाला दुःख होत आहे. पवई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पालकांना कळवण्यात आले आहे. आम्ही विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो. तसेच, कुटुंबाला हे नुकसान सहन करण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना. त्याच्या आत्म्याला शांती लाभो असेही ते आपल्या शोक संदेशात म्हणाले आहेत. तसेच, आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल (APPSC) आयआयटी बॉम्बेने ट्विट केले आहे. आम्ही 3 महिन्यांपूर्वी (@iitbombay)मध्ये (BTech)साठी रुजू झालेल्या 18 वर्षीय दलित विद्यार्थ्याच्या दर्शन सोळंकीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. असे ट्विट केले आहे.
मूळचा अहमदाबादचा : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन सोलंकी (वय १८) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याने आयआयटी पवईच्या वसतिगृहात आत्महत्या केली. दर्शन सोलंकी हा मूळचा अहमदाबादचा राहणारा होता. आयआयटी पवईत बी.टेक मेकॅनिकलच्या पहिल्या वर्षात शिकत होता. दर्शन तीन महिन्यांपूर्वीच शिक्षणासाठी मुंबईतील आयआयटीत दाखल झाला होता. दर्शनच्या आत्महत्येने संस्थेत एकच खळबळ उडाली आहे.
सुसाईट नोट सापडली नाही- एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कॅम्पसमधील सुरक्षा रक्षकांनी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनी सांगितले की, कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. प्राथमिक माहितीच्या आधारे, आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा : Pawar on Fadnavis: देवेंद्र फडणवीस हे सभ्य नेते! 'त्या' खुलाशावर शरद पवारांची प्रतिक्रिया