ETV Bharat / bharat

IIT Madras : आयआयटी मद्रासचे मोठे यश; सेप्टिक टँक सफाईसाठी 'होमोसेप' रोबोटची निर्मिती - आयआयटी मद्रास होमोसेप रोबोट

आयआयटी मद्रासने मानवी हस्तक्षेपाशिवाय सेप्टिक टँकची सफाई करणाऱ्या रोबोटची निर्मिती केली आहे. यामुळे सेप्टिक टँक सफाई काम करणाऱ्या कामगारांचे काम सोप्प झालं ( IIT Madras developes Robot clean Septic Tanks ) आहे.

Septic Tanks
Septic Tanks
author img

By

Published : Jun 9, 2022, 10:40 PM IST

चेन्नई - देशात प्रत्येक वर्षी सेप्टिक टँक साफ करताना हजारो कामगारांचा मृत्यू होतो. त्यासाठी अनेक ठिकाणी सेप्टिक टँक साफ करण्यासाठी उपकरणाची निर्मिती केली जात आहे. मात्र, त्यात अद्यापही पाहिजे तसे यश हाते आले नाही. त्यातच आता आयआयटी मद्रासने मानवी हस्तक्षेपाशिवाय सेप्टिक टँकची सफाई करणाऱ्या रोबोटची निर्मिती केली आहे. यामुळे सेप्टिक टँक सफाई काम करणाऱ्या कामगारांचे काम सोप्प झालं आहे. आयआयटी मद्रासने तयार केलेल्या या रोबोटला 'होमोसेप' असे नामकरण करण्यात आले ( IIT Madras developes Robot clean Septic Tanks ) आहे.

'होमोसेप' रोबोट हा ट्रॅक्टरच्या मदतीने चालवता येणार आहे. होमोसेफचे रोबोटचे प्रयोगशाळेत अनेक परीक्षण झाले आहेत. अद्याप प्रत्यक्ष त्याचे परीक्षण झाले नाही. जेव्हा हे प्रत्यक्ष वापरता येईल, तेव्हा कर्मचाऱ्यांना सफाई करण्यासाठी सेप्टिक टँकमध्ये स्वत: उतरावे लागणार नाही आहे.

IIT Madras developes Robot
आयआयटी मद्रासने तयार केलेले रोबोट

आयआयटी मद्रासच्या अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रभु राजगोपाल यांनी म्हटलं की, सेप्टिक टँकमध्ये विषारी वातावरण असते. जे मलमूत्राने भरलेले आहे. सेप्टिक टँकमध्ये उतरुन सफाई करण्यासाठी मानवाला बंदी आहे. तरीही, सेप्टिक टँकमध्ये उतरुन सफाई केल्याने भारतात प्रतिवर्षी शेकडो मृत्यू होतात. त्यामुळे होमोसेप रोबोट असे मृत्यू रोखण्यास मदत करेल. होमोसेप रोबटचा उपयोग सफाई कर्मचारी प्रशिक्षणानंतर करु शकतील, असेही प्रभु राजगोपाल यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, होमोसेप रोबोट प्रत्यक्ष परीक्षणासाठी पूर्णपणे तयार आहे. यासाठी पहिल्यांदा 10 रोबोट तयार करण्यात आल्याची माहिती आहे. त्याचे परीक्षण तामिळनाडूतील ठिकठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये देखील याचे परीक्षण करण्याचा विचार सुरु आहे.

हेही वाचा - चालत्या ट्रेनमधून मोबाईल लुटल्याचा लाइव्ह व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.