ETV Bharat / bharat

BRS Rally In Khammam : सत्तेत आलो तर मोफत वीज देणार; अग्निपथ योजनाही गुंडाळणार - केसीआर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यात भरती होण्यासाठी अग्निपथ ही योजना सुरू केली आहे. मात्र बीआरएस सत्तेत आल्यास अग्निपथ योजना गुंडाळणार असल्याची घोषणा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज खम्ममच्या सभेत केली. यावेळी त्यांनी मोफत वीज देणार असल्याचेही सांगितले. या सभेला विरोधी राज्यातील मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती.

BRS Rally In Khammam
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव
author img

By

Published : Jan 18, 2023, 10:53 PM IST

हैदराबाद - बीआरएस पक्ष सत्तेत आल्यास नागरिकांना मोफत वीज देणार असल्याची घोषणा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केली. तरुणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेली अग्निपथ योजना गुंडळणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. सभेत जमलेला प्रचंड जनसमुदाय हे देशातील सत्ता बदलाची नांदी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते खम्मम येथील जनसभेला संबोधित करत होते. यावेळी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, सीपीआयचे जनरल सचिव डी राजा, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आदींची उपस्थिती होती.

बीआरएसची रॅली : तेलंगाणामधील खम्मम येथे मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेतृत्वात बीआरएसच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी बोलताना केसीआर यांनी देशात तेलंगाणा मॉडेल लागू करण्यात येईल, अशी घोषणा केली. बीआरएस सत्तेत आल्यावर नागरिकांना मोफत वीज देण्यात येईल. शेतकऱ्यांना मुबलक पाणी आणि वीज पुरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बीआरएस एलआयसीसाठी उभारणार लढा : तेलंगाणा राष्ट्र समितीचे रुपांतर आता बीआरएसमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी खम्मम येथे बीआरएसच्या मोठ्या रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री एकवटले होते. यावेळी बोलताना केसीआर यांनी बीआरएस एलआयसीसाठी मोठा लढा उभारणार असल्याचे जाहीर केले. एलआयसीचे एजंट, कर्मचारी बीआरएसला भक्कम पाठिंबा देणार असल्याचे केसीआर यांनी यावेळी सांगितले. बीआरएस एलआयसीला मजबूत करणार असल्याचेही केसीआर यांनी यावेळी जाहीर केले.

भारतात समृद्ध जलस्त्रोत : आपला देश समृद्ध जलस्त्रोत असलेला देश आहे. देशात 70 हजार टीएमसी पाणी उपलब्ध आहे. मात्र आपण फक्त 20 हजार टीएमसी पाण्याचा वापर करतो. चेन्नई शहरातील नागरिक तर बादलीभर पाण्यासाठी झगडत असल्याचेही केसीआर यांनी यावेळी सांगितले. दुसरीकडे चीनमध्ये 5 हजार टीएमसी पाण्याचा साठा आहे. मात्र आपल्या देशात असा कोणताही जलसाठा नसल्याची खंतही केसीआर यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे राज्याराज्यात पाण्यासाठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कॅनडातून गूळ आयात केल्याच्या घटनेवरही त्यांनी प्रचंड टीका केली.

शेतकरी रोज आत्महत्या करत आहे : देशातील शेतकऱ्यांवर रोज आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मात्र भाजप सत्तेत आला तर काँग्रेसवर टीका केली जाते आणि काँग्रेस सत्तेत आल्यावर भाजपवर टीका केली जाते. देशात मुबलक अशी 4.10 लाख मेगावॅट वीज उपलब्ध आहे. मात्र आपण 2.10 लाख कोटी मेगावॅटपेक्षा जास्त वीज वापरली नसल्याचा हल्लाबोलही केसीआर यांनी यावेळी केला.

हेही वाचा - PM Modi Mumbai Visit : पंतप्रधांनाच्या बीकेसी येथील सभेसाठी शिंदे गट आणि भाजपकडून जय्यत तयारी सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.