ETV Bharat / bharat

ICSE Board Exam 2023 : काही 'टिप्स' ज्या तुम्हाला बोर्ड परिक्षेत चांगले गुण मिळवण्यास मदत करतील - बोर्ड परिक्षेसाठी टिप्स

सीबीएसई, आयसीएसई आणि यूपी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला अशा 7 टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्हाला 90+ गुण मिळवण्यास मदत करतील.

Board Exam 2023
बोर्ड परिक्षा
author img

By

Published : Feb 27, 2023, 10:28 AM IST

Updated : Feb 27, 2023, 10:46 AM IST

नवी दिल्ली : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सच्या, इयत्ता 10 च्या बोर्ड 2023 च्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. 27 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून या परिक्षा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी, आयसीएसई विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेचा पेपर आहे. परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार असून पेपरचा कालावधी २ तासांचा आहे. सकाळी 10:45 वाजता प्रश्नपत्रिका वितरित केल्या जातील आणि विद्यार्थ्यांना त्या वाचण्यासाठी 15 मिनिटे मिळतील. त्यानंतर राहिलेल्या वेळेत त्यांना पेपर पूर्ण सोडवायचा आहे.

बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या : सीबीएसई, आयसीएसई आणि यूपी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थी परीक्षांच्या तयारीत व्यस्त आहेत. परीक्षेत यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमासोबतच रणनीतीही खूप महत्त्वाची असते. जर तुम्ही रणनीतीसह कठोर परिश्रम केले तर तुम्ही परीक्षेत चांगली कामगिरी करू शकता. विद्यार्थ्यांसाठी काही टिप्स आहेत. जे परीक्षेत चांगलेच यश मिळवण्यात मदत करू शकतात.

  1. परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचा : परीक्षा सुरू होण्याच्या आधी म्हणजेच पेपरचे वितरण होण्याच्या ५ मिनिटे आधी आुपल्या जागेवर जाऊन बसा. उशिरा आल्यास मन अस्थीर तर होईलच पण धावपळ देखील होईल. अपवादात्मक परिस्थिती वगळता अर्ध्या तासापेक्षा जास्त उशिरा आलेल्या उमेदवाराला पेपर दिला जात नाही. हे लक्षात ठेवा.
  2. प्रश्नपत्रिकेच्या शीर्षस्थानी दिलेल्या सूचना वाचा : प्रश्नपत्रिकेच्या शीर्षस्थानी दिलेल्या सूचना वाचा. प्रश्नांच्या संख्येबाबत प्रश्नपत्रिकेत नमूद केलेल्या प्रश्नांचीच उत्तरे द्या. त्याव्यतिरीक्त काही जास्त करू नका. दुसरीउत्तरे लिहील्यास ते बाद ठरतात.
  3. कुठेही काहीही लिहू नका : उत्तर पत्रिकेच्या वरच्या पानावर कुठेही काहीही लिहू नका. तुमचा UID (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर), निर्देशांक क्रमांक आणि विषय मुख्य उत्तर पुस्तिकेच्या वरच्या पत्रकावर दिलेल्या जागेवरच लिहा. खाडाखोड चालणार नाही.
  4. खाडाखोड चालणार नाही : उत्तर पुस्तिकेवरील सर्व नोंदी काळ्या/निळ्या बॉलपॉईंट पेनने किंवा फाउंटन पेनने कराव्यात.
  5. योग्य मार्जिन सोडा : उत्तरपत्रिकेच्या उजव्या हाताच्या आणि डाव्या हाताच्या दोन्ही कडांवर मार्जिन सोडा. प्रश्नाच्या प्रत्येक भागाचे उत्तर वेगळ्या ओळीवर सुरू करा. प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीला डाव्या हाताच्या समासात प्रश्नाची संख्या स्पष्टपणे लिहा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर एक ओळ सोडा.
  6. इलेक्ट्रॉनिक उपकरण टाळा : परिक्षेच्या काळात कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण, हातात, डेस्कवर किंवा इतर प्रकारचे कॅल्क्युलेटिंग मशीन वापरण्याची परवानगी नाही.
  7. पुरवण्या क्रमवार लावा : तुमच्या उत्तरांच्या पुरवण्या क्रमवार लावा. अन्याथा पुरवण्याचा क्रम चुकल्यास पेपर चेक करणारा शिक्षक गोंधळून जाण्याची शक्यता असते. सर्वात वरचे पहिले पान आणि त्यानंतर पुरवणी क्रमांक, त्यानंतर पुरवणी क्रमांक2 असा सेट तयार करून द्या. पुरवण्यास जोडणारा धागा व्यवस्तीत बांधा अन्या तो सुटू शकतो.
  8. सोशल मीडियापासून दूर राहा : अभ्यासादरम्यान सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे थांबवा. तुम्ही अभ्यासादरम्यान लॅपटॉप मोबाईल टॅब्लेट सारखे इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरत असल्यास, तुमच्या गॅझेटमधील सोशल मीडिया अ‍ॅप्स पूर्णपणे बंद असल्याची खात्री करा. शक्य असल्यास, परीक्षेदरम्यान तुमच्या गॅझेटमधून सोशल मीडिया अ‍ॅप्लिकेशन स्कोअर काढून टाका कारण अभ्यासादरम्यान विचलित झाल्याचा परिणाम थेट परिणामांवर होतो.

हेही वाचा : Khalistan In Punjab : पंजाबमध्ये 1980 च्या दशकाची पुनरावृत्ती? वेळीच पावले न उचलल्यास पुन्हा पेटेल पंजाब!

Last Updated : Feb 27, 2023, 10:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.