ETV Bharat / bharat

IBPS Result : आयबीपीएस प्रिलिम्स निकाल 2022 जाहीर, जाणून घ्या स्कोअर कसा तपासावा - स्पेशालिस्ट ऑफिसर पदे

ज्या उमेदवारांनी आयबीपीएस (IBPS) एसओ प्रीलिम्स 2022, स्पेशालिस्ट ऑफिसर प्रिलिमीनरी परीक्षा (CRP SPL-XII) परिक्षा दिलेली होती. त्या उमेदवारांचा निकाल आज जाहीर झालेला आहे. उमेदवारांनी ibps.in वर त्यांचे गुण तपासून घ्यावे. अधिक माहिती करीता पूढे वाचा.

IBPS Result
आयबीपीएस प्रिलिम्स निकाल 2022
author img

By

Published : Jan 17, 2023, 6:06 PM IST

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने, स्पेशालिस्ट ऑफिसर प्रिलिमीनरी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. आज, 17 जानेवारी रोजी ibps.in या अधिकृत वेबसाइटवर स्पेशलिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी घेतलेल्या प्रिलिम्स परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला आहे. तुम्हीही या परीक्षेला बसला असाल, तर तुम्ही येथे दिलेल्या थेट लिंकवरून परीक्षेचा निकाल डाउनलोड करू शकता.

स्कोअर तपासणी : आयबीपीएस एसओ प्रीलिम्स 2022 परीक्षा 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. उमेदवार आपल्या आयडी कार्डचा वापर करुन; आयबीपीएस एसओ प्रीलिम्स निकाल 2022 तपासू शकतात. यासाठी IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा. मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या आयबीपीएस एसओ प्रीलिम्स निकाल 2022 (CRP SPL-XII) लिंकवर क्लिक करा. त्यामध्ये नोंदणी क्रमांक, रोल क्रमांक आणि पासवर्ड, जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट करा. असे केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल. त्यानंतर तुम्ही तुमचा स्कोअर तपासा आणि पेज डाउनलोड करा.

मुख्य परीक्षा लवकरच : 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी प्राथमिक परीक्षा घेण्यात आली. आज परीक्षेचा निकालही जाहीर झाला.आयबीपीएस एसओ प्रिलिम्स निकाल तपासण्याची सुविधा 25 जानेवारी 2023 पर्यंत उपलब्ध असेल. या परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना आता मुख्य परीक्षेला बसावे लागणार आहे. ही मुख्य परीक्षा 29 जानेवारी 2023 रोजी आयोजित केले जाईल.

IBPS SO भर्ती 2022: या प्रक्रियेद्वारे स्पेशलिस्ट ऑफिसरच्या 710 रिक्त पदांची भरती केली जाईल. 1 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2022 या कालावधीत या पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. आयबीपीएस एसओ परीक्षा 2023 शी संबंधित अशा सर्व बातम्यांसाठी 'ईटिव्ही भारत' वरिल बातम्या वाचत राहा.

हेही वाचा : JEE Mains 2023 : जानेवारी सत्रासाठी प्रवेशपत्र आणि परीक्षा शहर यादी आज प्रसिद्ध होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.