दिल्ली/जयपुर - काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची बैठक झाली. या बैठकीनंतर गेहलोत म्हणाले की, मी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार नाही. (Gehlot Meets Sonia Gandhi) दरम्यान, पत्रकारांनी आपण राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहणार का? या प्रश्नावर ते म्हणाले की, हा निर्णय मी घणार नाही. तो निर्णय काँग्रेस अध्यक्ष घेणार आहेत.
![राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16506062_gehalot.jpg)
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे 1.30 तास चालली. (cm ashok gehlot big statement) बैठकीनंतर ते म्हणाले की, 50 वर्षात ज्या प्रकारे मला काँग्रेस पक्षाने जबाबदारी दिली, इंदिरा गांधींच्या काळापासून मला मिळाले ती जबाबदारी मी पार पाडली. दरम्यान, या बैठकीत मी संपूर्ण मुद्दे त्यांच्यासमोर ठेवले अस ते म्हणाले आहेत.
या निवडणुकीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू असतानाच अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. लोकसभा सदस्य शशी थरूर 30 सप्टेंबर रोजी सभापतीपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. राजस्थानमधील राजकीय संकटादरम्यान, पक्षाचे निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन यांनी 27 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळच्या तीन नेत्यांवर अनुशासनात्मक कारवाईची शिफारस केली होती. त्यानंतर काही वेळातच पक्षाच्या शिस्तपालन कृती समितीने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.