नामक्कल : तमिलनाडू चे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी रविवारी नामक्कल येथे पक्षातील स्थानिक प्रतिनिधीची एक बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, पक्षातील प्रतिनीधी जर का शिस्त व वेळेचे पालन केले नाही तर मग मला देखील हुकुमशहा बनुन कारवाई करावी लागेल. स्थानिक प्रतिनिधी म्हणजे लोकशाहीची जीवन रेषा असते. आदरस्थानी असलेले रामासामी आणि राजाजी यांनी अनुक्रमे इरोड और सलेम येथील पक्षातील स्थानिक प्रतिनिधी म्हणुनच सार्वजनिक क्षेत्रातील आपल्या कामाला सुरुवात केली होती.
स्टॅलिन यांनी नवनिर्वाचित महीला प्रतिनिधींना उद्देशुन त्यांना स्वतंत्रपणे कार्य करण्याची माहीती दिली. निवडून आलेल्या स्थानिक पक्षातील प्रतिनिधींनी कायदा, निरपेक्षता आणि न्याय या तत्वांचे पालन करीत नागरीकांची सेवा करायला हवी. असा सल्ला देत; या तत्वांचे उल्लंघन करणाऱया प्रतिनिधींवर कारवाई करणार असल्याच ते यावेळी म्हणाले. तसेच, या नियमांचे पालन न करणाऱया प्रतिनिधींवर केवळ पक्षीकच नव्हे ; तर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. द्रमुक पक्षाला ही सत्ता वाटते तेवढ्या सहज मिळाली नसुन पक्षाच्या करोडो कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे. तसेच, गेल्या पाच दशकांपासुन नागरीकांसाठी केलेल्या मेहनतीमुळेच मी मुख्यमंत्री बनलेलो आहे.
हेही वाचा : Femina Miss India 2022 : कर्नाटकच्या सिनी शेट्टीने जिंकला फेमिना मिस इंडिया 2022 चा ताज