ETV Bharat / bharat

I was raped says victim after 12 yrs:'माझ्यावर बलात्कार झाला', 12 वर्षांनंतर पीडित मुलगीने केला गौप्यस्फोट

कर्नाटकात एका पीडितेवर सहा वर्षांची असताना पहिल्यांदा बलात्कार करण्यात आला (I was raped says victim after 12 yrs). त्यानंतर तिने ही बाब अनेकांच्या निदर्शनास आणून दिली. इतरांनीही तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे (accused arrested).

12 वर्षांनंतर पीडित मुलगीने केला गौप्यस्फोट

author img

By

Published : Jul 27, 2022, 5:20 PM IST

बंगळुरू: येथे एका धक्कादायक प्रकरणात बलात्कार पीडितेने 12 वर्षांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा दावा करत कर्नाटक पोलिसांकडे धाव घेतली आहे (I was raped says victim after 12 yrs). या तक्रारीनंतर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ आरोपींपैकी सहा जणांविरुद्ध प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत (accused arrested). ही घटना 2010 मध्ये बेंगळुरूच्या विद्यारण्यपुरा परिसरातील दोड्डाबेट्टाहल्ली येथे घडली होती, असे पोलिसांनी सांगितले.

परिस्थितीचा फायदा घेतल्याचा आरोप - पीडित मुलगी 6 वर्षांची होती, तेव्हा तिच्या पालकांनी तिला घरी सोडून ते कामावर गेले. त्यांचा हा नित्यक्रम होता. आरोपी सायमन पीटरने केअरटेकरसोबत परिस्थितीचा फायदा घेतल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्याने तिला अश्लील छायाचित्रे दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिने पोलिसांना सांगितले की आरोपी सायमन पीटरने ती 14 वर्षांची होईपर्यंत तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवला.

ब्लॅकमेल करण्यास सुरुवात - लैंगिक अत्याचार सहन न झालेल्या पीडितेने याची माहिती स्मॉएल डिसूझा याला दिली. तोही डोड्डाबेट्टाहल्ली एरियामध्ये राहत होता. त्याने आरोपीला फटकारलेही होते आणि पीडितेला त्रास देऊ नका असे बजावले होते. मात्र फिर्यादीने पोलिसांना वेगळीच गोष्ट सांगितली. सॅम्युअल डिसूझा, ज्याला तिने तिच्या त्रासाची माहिती दिली होती, त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. दुस-या आरोपीने मुलीला धमकी दिली की तो या प्रकरणाचा बोभाटा करेल. त्याचवेळी त्यानेही पत्नी किंवा इतर कोणीही संशय घेणार नाही याची काळजी घेत तिच्यावर २ वर्षे बलात्कार केला.

अखेर पोलिसांकडे तक्रार - सततच्या लैंगिक अत्याचारानंतर निराश झालेल्या मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. बलात्काराची घटना कळल्यानंतरही सहा जणांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींवर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायदा, सामूहिक बलात्कार आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

हेही पाहा - Liquor worth 2 crores destroyed: रोडरोलरखाली सुमारे 2 कोटींच्या दारू बाटल्यांचा चुराडा, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.