ETV Bharat / bharat

IT Raid Two TN Group : तामिळनाडूतील दोन व्यापाऱ्यांवर आयकर विभागाची मोठी कारवाई; 500 कोटींची मालमत्ता जप्त

author img

By

Published : Jul 13, 2022, 8:58 PM IST

तामिळनाडूत आयकर विभागाने मोठी कारवाई केली ( dept detects Rs 500-cr black income )आहे. तामिळनाडूतील दोन व्यापाऱ्यांकडे 500 कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आली ( IT Raid Two TN Group ) आहे.

I-T dept
I-T dept

चेन्नई - तामिळनाडूत आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. तामिळनाडूतील दोन व्यापाऱ्यांकडे 500 कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आली ( dept detects Rs 500-cr black income ) आहे. तामिळनाडूमधील नागरी करार, रिअल इस्टेट, जाहिरातींच्या व्यवसायात गुंतलेल्या दोन व्यावसायिक गटांच्या 40 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. त्यामध्ये आयकर विभागाला 500 कोटींहून अधिकची मालमत्ता आढळून आली. ती मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ही कारवाई केली ( IT Raid Two TN Group ) आहे.

सीबीडीटीने एका निवेदनात म्हटले आहे की, जप्त करण्यात आलेली कागदपत्रे डिजीटल साधनांच्या तपासणीत आढळले की दोन्ही गट गेल्या काही वर्षांत फसव्या खरेदी आणि खर्चाचा दावा करुन त्यांचे उत्पन्न लपवत आहे. तसेच, नफ्याच्या वाटणी दाखवणारे पुरावे आढळले आहेत. या सर्वांचा हिशोब नियमित कागपत्रांत आढळला नाही. सीबीडीटीच्या दुसऱ्या गटाला असे सापडले की, या गटाने अनेक बनावट संस्था तयार केल्या. ज्यांचा वापर फसव्या खरेदी आणि खर्चाचा दावा करण्यासाठी केला जात होता.

500 कोटींहून अधिकची मालमत्ता - ही बेहिशेबी आणि फसव्या व्यवहारांची माहिती डॉक्युमेंटरी आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ठेवलेली अनेक गुप्त ठिकाणे पथकाने शोधली आहेत. सीबीडीटीने सांगितले की, या दोन्ही समूहांची अघोषित मालमत्ता 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

हेही वाचा - Five Transgenders Murder a Man : सेक्स करण्याची इच्छा पडली महागात; ट्रान्सजेंडरसोबत झालेल्या वादात गमवावा लागला जीव, वाचा सविस्तर...

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.