उडुपी : कोणत्याही मंदिरात जाताना राहुल गांधी लोकभावनेची किती काळजी घेतात याचा प्रत्यय कर्नाटकात आला आहे. सध्या कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत राहुल गांधी सध्या प्रचारासाठी आलले आहेत. त्यांनी सभांच्या बरोबरच त्या ठिकाणची देवस्थाने तसेच मठांनाही भेट देण्याचा सपाटा लावला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे गुरुवारी उडुपी दौऱ्यावर असताना एक अशीच महत्वपूर्ण घटना घडली. कापू तालुक्यातील उचिला महालक्ष्मी मंदिराच्या सभागृहात आयोजित संवाद कार्यक्रमात राहुल गांधी गेले होते. उडुपी जिल्हा काँग्रेसने राहुल गांधींना मोठ्या आकाराचे अंजल मासे यावेळी भेट दिले. राहुल यांनी हे मासे हातात पकडून तेथील महिलांच्याबरोबर फोटोसेशनही केले. त्यामुळे या महिला आनंदी झाल्या.
या ठिकाणी आयोजत केलेल्या कार्यक्रमात नंतर लगेच हे फोटोसेशन झाले. राहुल गांधी यांना संवाद कार्यक्रमानंतर थेट महालक्ष्मी मंदिरात आणण्यात आले. हातात मासा धरलेल्या राहुल यांनी मंदिराच्या दारात येताच तेथील लोकांना आधी विचारले, की आपण मासे हातात घेतले होते. आपण मंदिरात प्रवेश करु शकतो काय. कारण राहुल गांधी यांनी मासे हाती घेतल्यानंतर हात धुतले नव्हते, ते तसेच मंदिरात आले होते. यावेळी त्यांच्या आजूबाजूला असलेले काँग्रेसचे नेते आणि मोगवीराचे नेते म्हणाले, काही हरकत नाही, त्यांना आत येऊ द्या. मात्र यावेळी समयसूचकतेने राहुल गांधी यांनी विचारेला प्रश्न मात्र खूपच चर्चेत आला आहे. त्यांचा यासंदर्भातील व्हिडिओही आता माध्यमांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.
राहुल गांधी यांनी मंदिरात जाऊन नंतर दर्शन घेतले. यावेळी पुजाऱ्यांनी त्यांच्यासाठी विशेष पूजा केली. तसेच त्यांना प्रसादही दिला. राहुल गांधींच्या या समयसूचक कृतीमुळे मात्र त्यांचे कोतुक होत आहे. कर्नाटकात निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. स्वतः राहुल गांधी आणि प्रियंका गांधी याही प्रचारात सहभागी झाल्या आहेत. विद्यमान काँग्रेस अध्यक्षांचे हे राज्य असल्याने पक्षाचे या निवडणुकीवर विशेष लक्ष आहे.