कोलकाता - यंदा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर 'दीदी-भतीजा’ मुद्द्यावरून निशाणा साधला. यावर ममता बॅनर्जीं यांनींही अमित शाह यांच्यावर पलटवार करत आव्हान दिलं. अमित शाह यांनी सर्वप्रथम अभिषेक बॅनर्जीविरोधात निवडणूक लढवून दाखवावी आणि मग माझा सामना करावा, असे खुले आव्हान ममता यांनी दिले आहे. दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील पायलान येथील रॅलीला संबोधित करत होत्या.
दिवस-रात्र अमित शाह 'दीदी-भतीजा’ मुद्द्यावर बोलत असतात. अभिषेक बॅनर्जी हे जनतेचे निवडलेले प्रतिनिधी आहेत. मी अमित शहा यांना आव्हान देतो की त्यांनी मुलाला राजकारणात आणले. अभिषेक यांना राज्यसभेचे सदस्य होऊन सोप्या मार्गाने खासदार होता आले असते. मात्र, त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि जनादेश मिळवला. मी अमित शाह यांना आव्हान देते, की त्यांनी आधी अभिषेक बॅनर्जीविरोधात निवडणूक लढावी आणि नंतरच माझा सामना करावा, असे खुले आव्हान ममता यांनी केले.
ममता बॅनर्जी यांनी यावेळी शाह यांच्या मुलावरूनही त्यांच्यावर टीका केली. मुलगा क्रिकेट प्रशासनाचा भाग कसा झाला आणि त्याने कोट्यवधी रुपये कसे कमावले, असा सवाल दीदींनी केला.
दीदींवरील आरोप -
अमित शाह यांच्यासह भाजप नेते बॅनर्जींवर सातत्याने वंशवादाच्या राजकारणाचा आरोप करतात. मोदी सरकार "लोककल्याणासाठी" काम करते. तर ममता बॅनर्जी जनतेच्या कल्याणाऐवजी फक्त स्वत:च्या भाच्याच्या कल्याणासाठी काम करताता, असे शाह एका सभेत म्हणाले होते.
अभिषेक बॅनर्जी कोण आहेत?
अभिषेक बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बर आणि दक्षिण 24 परगनाचे प्रतिनिधीत्व करतात. पक्षात दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे स्थान आहे. 2011 मध्ये झाले राजकारणात प्रवेश केला होता. ममता बॅनर्जी यांचे भाऊ अमित बॅनर्जी यांचे ते पुत्र आहेत. तर काही दिवसांपूर्वी घराणेशाहीवरून मोदींना आव्हान दिलं होतं. केंद्र सरकारने जर एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला राजकारणामध्ये प्रवेश करता येईल असा काही कायदा आणला तर मी लगेच राजकारण सोडून देईन, असं अभिषेक यांनी म्हटलं होतं. तसेच माझ्यावर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले. तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईल, असंही म्हटलं होतं.