ETV Bharat / bharat

'मनमोहन सिंहांचेच काम मी पुढे नेत आहे' - agri law

मनमोहन सिंहांनी मनोदय व्यक्त केले होते तेच काम आम्ही केले आहे. काँग्रेसला तर याचा अभिमान वाटला पाहिजे असे मोदी म्हणाले.

'मनमोहन सिंहांचेच काम मी पुढे नेत आहे'
'मनमोहन सिंहांचेच काम मी पुढे नेत आहे'
author img

By

Published : Feb 8, 2021, 1:22 PM IST

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही कृषी सुधारणांची शिफारस केली होती. त्यांचेच काम मी पुढे नेत आहे असे मोदी राज्यसभेत बोलताना म्हणाले.

मनमोहन सिंह यांच्या विधानाचा दाखला

कृषी सुधारणांची शिफारस करताना मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या विधानाचा दाखला दिला. मनमोहन सिंह यांनी शेतकऱ्यांना उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य तसेच देशात एकच बाजार व्यवस्था उभारण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यांनी जे मनोदय व्यक्त केले होते तेच काम आम्ही केले आहे. काँग्रेसला तर याचा अभिमान वाटला पाहिजे असे मोदी म्हणाले.

शरद पवारांचाही सुधारणांना पाठिंबा

माजी कृषीमंत्री शरद पवार यांनीही ते सुधारणेच्या बाजूने असल्याचे सांगितले आहे. या कायद्यांविषयी कुणाला आक्षेप नाही. केवळ ते घाई-गडबडीत मंजूर केल्यावर आक्षेप घेतला जात आहे. असे होतच असते असे मोदी म्हणाले.

मागील सरकारांचा दिला दाखला

केवळ भाजपच्याच नव्हे तर यापूर्वीच्या सर्वच सर्व सरकारांनी नेहमीच कृषी सुधारणांची शिफारस केली आहे. हरीत क्रांतीच्या वेळेसही असेच झाले होते. तेव्हा तर सुधारणांना होणारा विरोध पाहून कुणी कृषीमंत्रीपद घेण्यासही तयार नव्हते. मात्र लाल बहादुर शास्त्रींनी कणखरपणा दाखवत तेव्हा यासाठी पुढाकार घेतला. डाव्यांनी तर तेव्हा शास्त्रीजींना अमेरिकेचे एजंट संबोधले होते असे मोदींनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.