ETV Bharat / bharat

Wife Murdered: 'माझ्यासाठी जीव देशील..?', बायकोने हो म्हणताच, नवऱ्याने घेतला जीव.. मेहुणीच्या प्रेमात दाबला बायकोचा गळा - मेहुणीसोबत प्रेम संबंध

उत्तरप्रदेशच्या बरेली जिल्ह्यात मेहुणीच्या प्रेमात पडलेल्या पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. यानंतर ही घटना लूटमारीची असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न त्याने केला. या प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली.

husband strangles wife to death in bareilly after asking can you die in love
'माझ्यासाठी जीव देशील..?', बायकोने हो म्हणताच, नवऱ्याने घेतला जीव.. मेहुणीच्या प्रेमात दाबला बायकोचा गळा
author img

By

Published : Feb 18, 2023, 5:31 PM IST

मेहुणीच्या प्रेमात दाबला बायकोचा गळा

बरेली (उत्तरप्रदेश): उत्तरप्रदेशच्या बरेलीतील बिथरी चैनपूर पोलीस स्टेशन हद्दीत पतीने पत्नीची फिल्मी स्टाईलमध्ये हत्या केली. पतीने प्रथम पत्नीला विचारले 'माझ्या प्रेमासाठी तू तुझा जीव देऊ शकतेस का' आणि पत्नीने हो म्हटले. यानंतर पतीने तिची गळा दाबून हत्या केली. प्रकरण 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीचे आहे. त्याचवेळी, पोलिसांनी 18 फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी घटनेचा खुलासा करताना आरोपी पतीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे त्याच्या मेहुणीसोबत प्रेमसंबंध होते.

हत्या करून लूटमार दाखवले: बिथरी चैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पदरथपूर गावातील रहिवासी असलेल्या डॉ. फारुक याने पोलिसांना तक्रार दिली होती. तक्रारीत फारुखने सांगितले होते की, 14 फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी औषध घेण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी लुटमारीची घटना घडवली. लूटमारीला विरोध केल्याने फारुखची पत्नी नसरीनची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे त्याने तक्रारीत सांगितले. तसेच चोरट्यांनी डॉ.फारूख आलम यांना धक्काबुक्की करून जखमी केले व घरात ठेवलेले लाखो रुपयांचे दागिने लंपास करून पळ काढला, असेही म्हटले.

गळा दाबून मृत्यू झाल्याचे स्पष्ट: या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ तपास सुरू केला. यासोबतच मृत नसरीनचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. नसरीनचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. यानंतर पोलिसांनी घटनेच्या संदर्भात एक एक लिंक जोडून या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलीस तपासात प्रथमदर्शनी या घटनेत मृत महिलेच्या पतीवर संशय आला.

मेहुणीवरील प्रेमातून कृत्य : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. फारुख आलम यांचे सासरचे घर पदरथपूर गावात असून ते येथे राहत होते. तो त्याच्या घराच्या एका भागात दवाखाना चालवत असे. फारुखचे त्याच्या मेहुणीसोबत खूप दिवसांपासून प्रेमसंबंध होते आणि दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे होते. त्यांची प्रेमकहाणी आणि लग्न यामध्ये पत्नी अडथळा ठरत होती, त्यानंतर पत्नीला मार्गातून दूर करण्यासाठी पतीने अत्यंत फिल्मी पद्धतीने ही भयानक घटना घडवून आणली.

दागिने ठेवले लपवून: वरिष्ठ पोलिस अधीक्षक अखिलेश चौरसिया यांनी सांगितले की, 'डॉ. फारुख आलमचे त्याच्या मेहुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचे होते, पण बायको आड येत होती. पत्नीला मधूनच काढण्यासाठी त्याने घटनेच्या आदल्या दिवशी घरात ठेवलेले दागिने फिल्मी स्टाईलमध्ये बाहेर लपवून ठेवले. यानंतर रात्री पत्नीला विचारले की, 'तिचे त्याच्यावर किती प्रेम आहे आणि ती त्याच्या प्रेमासाठी जीव देऊ शकते का'?

ब्लेडने केला घाव: पत्नी नसरीनने पती फारुख आलमला तिच्या प्रेमासाठी प्राणाची आहुती देण्याचे सांगताच डॉ. फारुख आलमने पत्नीला तोंडात कपडा भरण्यास सांगितले. आलम याच्या सांगण्यावरून पत्नी नसरीनने तोंडात कपडा भरताच मेहुणीच्या प्रेमात पागल झालेल्या फारुख आलम याने तिचा गळा दाबून खून केला. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने घरात ठेवलेले सामान पसार केले आणि पोटाला सुन्न करणारे इंजेक्शन देऊन ब्लेडने घाव केला. पोलिसांनी आलम याला अटक केली. आलम याने आपला गुन्हाही मान्य केला आहे.

पतीने दिली कबुली: पोलीस चौकशीत आरोपी पती फारूख याने गुन्ह्याची कबुली दिली आणि सांगितले की, 'त्याने पत्नी नसरीनचा स्वतःच्या हाताने गळा दाबून खून केला, कारण त्याचे तिच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. त्याला तिच्या बहिणीशीलग्न करायचे होते. तीन-चार दिवसांपूर्वी त्याच्या मेहुणीने त्याला सांगितले होते की, तिच्या बहिणीमुळे आपण त्याच्याशी लग्न करू शकत नाही. यानंतर पत्नीला मार्गावरून दूर करण्यासाठी त्याने हा संपूर्ण भयानक प्रकार घडवून आणला आणि स्वत:च्या हाताने तिचा गळा आवळून खून केला.

हेही वाचा: Lesbian Love: एकमेकींच्या प्रेमात पडल्या दोन मुली.. आता 'लिंग' बदलून करणार लग्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.