ETV Bharat / bharat

Husband hacks wife to death: ब्रश न करता मुलाचे चुंबन घेण्यापासून पतीला थांबवल्याने पत्नीचा केला खून

केरळमध्ये पतीने पत्नीची हत्या केली. हत्येचे कारण एवढेच होते की, पत्नीने आपल्या दीड वर्षाच्या मुलाचे चुंबन घेण्यापूर्वी दात घासण्यास सांगितले.

पती पत्नीचा फोटो
पती पत्नीचा फोटो
author img

By

Published : Jun 30, 2022, 10:43 PM IST

केरळ - केरळमधून एक धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. येथील पलक्कड जिल्ह्यात पतीनेच पत्नीची हत्या केली. कारण तच सर्वांनाच आश्यर्यचकित करणारे आहे. ( Husband hacks wife to death ) पत्नीने आपल्या पतीला तिच्या दीड वर्षाच्या मुलाला ब्रश न करता चुंबन घेण्यापासून रोखले. त्याचा राग आल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. परंतु, उपचारादरम्यान, तीचा मृत्यू झाला. पलक्कड जिल्ह्यातील काराकुर्सी येथील ही घटना आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

उपचारादरम्यान तिचा मृत्यू - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ही घटना घडली जेव्हा पती अविनाशला पत्नी दीपिकाने त्यांच्या दीड वर्षाच्या मुलाचे ब्रश न करता चुंबन घेण्यापासून रोखले. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि अविनाशने रागाच्या भरात दीपिकावर कुऱ्हाडीने वार केले. त्यामुळे पत्नीच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाली.

रक्ताच्या थारोळ्यात पडली होती - यावेळी दीपिकाचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी दिपीका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दरम्यान, दीपिकाला रक्तस्त्राव अवस्थेत पडलेले पाहिल्यानंतर तीला प्रथम पेरिंथलमन्ना एमईएस रुग्णालयात आणि नंतर एमईएस सहकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

एअरफोर्स सिव्हिल कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीत सहाय्यक पर्यवेक्षक म्हणून काम करणारा अविनाश दोन महिन्यांपूर्वीच कुटुंबासह काराकुरीसी येथे राहायला आला होता. अविनाशने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता, जी आधी ओडिशाची होती आणि 2019 मध्ये दीपिकाशी दुसरे लग्न केले होते तीचाही त्याने अशा कारणाने खून केला.

हेही वाचा - Rebel MLAs Celebrated in Goa : मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच गोव्यात बंडखोर आमदारांचा जल्लोष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.