ETV Bharat / bharat

New HP Laptops Launches : एचपीने भारतात कंटेंट निर्मात्यांसाठी नवीन Envy x360 15 लॅपटॉप लॉन्च केले

author img

By

Published : Jan 23, 2023, 3:26 PM IST

एचपीने भारतातील कंटेंट निर्मात्यांसाठी तयार केलेल्या 12th Gen Intel Core EVO i7 प्रोसेसरसह सुसज्ज अश्या Envy x360 लॅपटॉपची नवीन श्रेणी सादर केली.

New HP Laptops Launches
नवीन Envy x360 15 लॅपटॉप लॉन्च

नवी दिल्ली: कम्प्युटर आणि प्रिंटरचे प्रमुख उत्पादनकर्ता HP Inc ने सोमवारी देशातील कंटेंट निर्मात्यांसाठी बनवलेल्या Envy x360 15 लॅपटॉपची नवीन श्रेणी सादर केली. हा लॅपटॉप, 15.6-इंचाचा OLED टच डिस्प्ले आणि टिकाऊ 360- degree hinge, 82,999 रुपयांच्या किमतीपासून पुढे आणखी विविध किंमतींमध्ये उपलब्ध आहेत.

EVO i7 प्रोसेसर : 'HP चा नवीन Envy x360 15 पोर्टफोलिओ कंटेंट निर्मात्यांना सर्वोत्तम-इन-क्लास डिस्प्ले आणि स्मार्ट, उच्च-कार्यक्षमता उत्पादकता वैशिष्ट्यांद्वारे स्वतःला अभिव्यक्त करण्यास सक्षम करते', असे पर्सनल सिस्टम्स, HP इंडियाचे वरिष्ठ संचालक विक्रम बेदी म्हणाले. अधिक चांगले कार्य आणि प्रभावी असे कार्यप्रदर्शन करण्यासाठी, नवीन HP Envy x360 15 पोर्टफोलिओ इंटेल आयरिस Xe ग्राफिक्ससह समाकलित केलेल्या 12 व्या जनरल इंटेल कोर EVO i7 प्रोसेसरसह येतो.

5MP IR कॅमेरा : कंपनीच्या म्हणण्यानुसार, फ्लिकर-फ्री आणि अँटी-रिफ्लेक्शन स्क्रीन दीर्घकाळापर्यंत वापर करूनही त्याची क्वालिटी शेवटपर्यंत टिकुन राहाते. शिवाय डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी आयसेफ डिस्प्लेद्वारे स्क्रीन आणखी सुरक्षित करण्यात आली आहे. डिव्हाइस जलद संप्रेषणासाठी इमोजी कीबोर्ड, ऑटो फ्रेम तंत्रज्ञान आणि वर्धित गोपनीयतेसाठी एआय नॉइज रिडक्शन यासारख्या बुद्धिमत्ता वैशिष्ट्यांसह 5MP IR कॅमेरा या लॅपटॉप मध्ये देण्यात आलेला आहे.

बॅटरी 10 तासांपर्यंत चालण्यास सक्षम : दीर्घकाळ टिकणाऱ्या गोष्टींवर HP ने सतत लक्ष केंद्रित करून, नवीन Envy x360 15 पोर्टफोलिओमध्ये समुद्रात वापरण्यात येणारे प्लास्टिक आणि पुनर्नवीनीकरण केलेले ॲल्युमिनियम समाविष्ट आहे. मोठी स्क्रीन आणि कमी स्क्रोलिंग करण्यासाठी हे 88 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह अधिक स्क्रीन रिअल इस्टेट देते. HP 'फास्ट चार्ज' क्विक चार्जिंगसह दीर्घ बॅटरी आयुष्य सक्षम करते, तर या लॅपटॉपची बॅटरी 10 तासांपर्यंत चालण्यास सक्षम आहे.

स्मार्ट टँक प्रिंटर : तर डिसेंबर महिन्यातच भारतातील घरगुती वापरकर्ते, सूक्ष्म आणि लघु व्यवसायांच्या दैनंदिन मुद्रण गरजांसाठी डिझाइन केलेल्या स्मार्ट टँक प्रिंटरच्या नवीन मालिकेचे अनावरण देखील एचपीने केले होते. प्रिंटरचे तीन मॉडेल उपलब्ध करण्यात आले होते - एचपी स्मार्ट टँक 210, एचपी स्मार्ट टँक 520 आणि एचपी स्मार्ट टँक 580, अनुक्रमे 13326 रुपये, 15980 रुपये आणि 18848 रुपये या किमतींमध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचा : HP smart tank printers launched : व्यवसायांच्या दैनंदिन मुद्रण गरजांसाठी एचपी स्मार्ट टँक प्रिंटर केले लाँच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.