ETV Bharat / bharat

Parenting News : नवीन वर्षात मुलांना लावा 'या' सवयी, मुलं राहतील हेल्दी ॲण्ड हॅप्पी

लहान मुलं खोडकरपणा आणि मस्ती करण्यात पटाईत करतात. लहानपणाच्या काही चुकीच्या सवयी मुलांच्या भविष्यावर गंभीर परिणाम करू शकतात. मुलं अजिबात ऐकत नसतील तर त्यांना शिस्त कशी लावायची, कसं नीट वागायला शिकवायचं हे मोठं चॅलेन्ज पालकांसमोर असतं. तेव्हा नवीन वर्षात (New Year 2023) आपण मुलांना केवळ शिस्तच (How To Disciplined Your Child) नव्हे, तर निरोगी आणि आनंदी कसे ठेऊ (Children will be Healthy and Happy) शकु, हे जाणुन घेऊया. Parenting News

author img

By

Published : Dec 30, 2022, 7:37 PM IST

Parenting News
मुलं राहतील हेल्दी ॲण्ड हॅप्पी

पालक म्हणून मुलांना वाढवताना आपल्याला बऱ्याच जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांना असणाऱ्या सवयींवरही लक्ष (How To Disciplined Your Child) ठेवण्याची गरज असते. स्वच्छतेच्या सवयी मुलांना असल्या की, त्यांच्या आरोग्याची हेळसांड होत नाही. ते आजारी पडत नाहीत किंवा गचाळ राहत नाहीत. तसेच मुलांना लहान पणापासुनच आनंदाची गुरुकिल्ली सांगितली की, ते मोठे झाल्यावर भविष्यात (New Year 2023) येणाऱ्या कोणत्याही संकटावर मात करण्यास सक्षम (Children will be Healthy and Happy) असतात. Parenting News

१) वेळोवेळी हात धुणे : मुलांना कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी हात धुण्यास सांगितले पाहिजे. हात न धुतल्यास जंतू हातामार्फत त्या पदार्थातून पोटात जाऊ शकतात, त्यामुळे पोटदुखी किंवा तशा इतर समस्या उद्भवू शकतात.

२) दातांची स्वच्छता : सकाळी उठून व्यवस्थित ब्रश करणे ही सवय मुलांच्या दाताच्या तसेच तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसे न केल्यास मुलांचे दात किडु शकतात, त्यामुळे दातांचं दुखणं हे वाढू शकतं. दात बळकट असल्यास मुले सगळेच पदार्थ खाऊ शकतात.

३) पायांची निगा : शाळेतून अथवा खेळून आल्यावर व्यवस्थित हात, पाय धुवून घरात वावरल्यास आरोग्य सुदृढ राहते. लहान मुलांच्या पायांवर फार जास्त जंतू असतात. कारण, ते बऱ्याच ठिकाणी फिरुन आलेले असतात. त्यामुळे पायाची निगा राखणं महत्वाचं असतं.

४) अंघोळ करणे : प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला रोज सकाळी आणि गरजेचं असल्यास संध्याकाळी अंघोळीची सवय लावणं गरजेचं आहे. कारण रोज नियमितपणे अंघोळ केल्यास जंतूंचा संसर्ग होत नाही व अनेक आजारांना दूर ठेवता येतं. शरीर आणि मन स्वच्छ राहतं आणि ताजं-तवानं वाटतं.

५) शौचाच्या सवयी : पालकांनी मुलांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शौचाची सवय लावणं खूप गरजेचं आहे. शौचाहून आल्यावर नियमितपणे हात व पाय धुण्यास सांगा. त्यामुळे तुमचं मूल नेहमी तंदुरूस्त राहिल आणि आजारांपासून दूर राहील..

6) रिव्हर्स काऊंटडाऊन : जेव्हा मुलांना राग येतो तेव्हा राग शांत करण्यासाठी त्यांना समजवा. त्यांना मारण्या किंवा ओरडण्यापेक्षा रिव्हर्स काऊंटिंग म्हणजेच उलटी मोजणी करायला सांगा. २ ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना तुम्ही ही शिक्षा देऊ शकता. कारण जेव्हा मुलं रागानं किंचाळतात तेव्हा १० ते १ रिव्हर्स काऊंटिंग करायला सांगितल्यानंतर ते मूलं शांत होतील आणि तुम्ही त्यांच्याशी बोलू शकाल. तसेच आपलं मत त्यांना नीट समजावुन सांगु शकाल.

7) रागवण्याचं कारण समजून घ्या : लहान मुलं उगाचच चिडचिड करत असतील तर, त्यांच्याशी शांततेनं बोला. प्रेमानं बोलल्यानं मुलांमध्ये एक वेगळा बदल दिसून येईल. यामुळे हळूहळू मुलं मनातलं तुमच्याशी शेअर करतील आणि त्यानंतर ते त्यांचा मुद्दा तुमच्यासमोर ठेवू लागतील, ज्यामुळे तुम्हाला त्यांना चांगले वागणूक शिकवण्यात मदत होईल.

8) सौम्य संभाषण पद्धतीचा अवलंब करा : शिस्त शिकवताना मुलाला त्याच्या वागण्यात काय चूक आणि काय बरोबर आहे, हे समजावून सांगणे आवश्यक आहे. परंतु मुलांना काय चुकीचे आहे ते थेट सांगल्याने ते अधिक खोडकर बनतात किंवा तुमच्यावर रागावू शकतात. त्यासाठी जुन्या पद्धतीचा अवलंब करू नका. त्यांना त्यांची चूक सांगून मारहाण करणे किंवा शिवीगाळ करणे, यामुळे मुले खूप हट्टी होऊ शकतात. म्हणूनच मुलांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी सौम्य संभाषण पद्धतीचा अवलंब करा.

मुद्दा समजावुन सांगा : मुलाला समजावून सांगा की, त्याने केलेली चूक त्याच्यासाठी आणि त्याच्या सभोवतालच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे त्याचे नुकसान होऊ शकतं, पालक आणि शिक्षकांसमोर त्याची प्रतिमा खराब होऊ शकते किंवा भविष्यात त्याचे नुकसान होऊ शकतं. अशा प्रकारे बोलल्याने मुलाला तुमचा मुद्दा समजू शकतो आणि हट्टीपणा किंवा वाद होण्याची शक्यता राहणार नाही. Parenting News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.