ETV Bharat / bharat

Deal With Childrens : आता तुमची मुलंही वाद घालू लागली आहेत का? अश्या प्रकारे घाला त्यांची समजुत

लहानपणी काही मुलं फार हट्टीपणा (aggressive) करतात. लहानपणी मुलांना बऱ्याच वेळेस वाद (argument habits) घालण्याची सवय लागते. पालकांनी आपलं म्हणणं ऐकावं यासाठी मुलं वाद घालू (bad habits) लागतात. काही सोप्या उपायांनी तुम्ही त्यांची समजूत घालून, त्यांची वाद घालण्याची सवय (How to deal with childrens) मोडू शकता. Parenting News

Deal With Childrens
अश्या प्रकारे घाला त्यांची समजुत
author img

By

Published : Jan 2, 2023, 4:13 PM IST

आई-वडिलांनी (Parents) कितीही प्रयत्न केला तरी लहान मुलं (Children) सहजपणे चुकीच्या सवयींच्या (bad habits) जाळ्यात अडकतात. पुरेशी माहिती नसल्यामुळे लहानपणी मुलं, पालकांनी आपलं म्हणणं ऐकावं यासाठी त्यांच्याशी किंवा मोठ्या माणसांशी बरेच वेळा वाद (arguments) घालू लागतात. अशा वेळी आई-वडील त्यांना रागावून वेळीच त्यांच्या चुकीची जाणीव करून देतात. मात्र तुमच्या ओरड्यामुळे किंवा मारामुळे मुलं तुमचं सगळंच ऐकायला लागतील आणि वाद घालणं सोडतील, असं दरवेळेस होणं शक्य नाही. कधीकधी मुलं आक्रमक (aggressive) होऊन अजून वाद घालणं सुरू करतात. अशा वेळी काय करायचं हे पालकांना कळत नाही. मुलांना कसे करावे, त्यांची समजूत कशी (How to deal with childrens) घालावी, (parenting tips) याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया. Parenting News

घरात जास्त कडक धोरणे नकोत : तुमच्या मुलांना वाद घालण्याची सवय लागलीअसेल, तर त्याच्याशी जास्त कठोरपणे वागू नका. अशा वेळी तुमचा ओरडा ऐकून किंवा मार खाऊन मुले आणखी हट्टी स्वभावाची होऊ लागतात. त्याचबरोबर त्यांना मारलं तर हळूहळू मुलांच्या मनात पालकांबद्दल असलेली भीतीही संपते. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना जास्त कडक धोरण ठेवू नये.

करा प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न : मुलांना त्यांच्या वाईट अथवा चुकीच्या सवयींबद्दल ओरडण्यापेक्षा, त्यांना जवळ बसवून प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करा. आपण जे सांगतो, ते पालकांनी ऐकावेच, आपला हट्ट पूर्ण करावा यासाठी मुलं बऱ्याच वेळा पालकांशी वाद घालतात. अशा वेळी त्यांना प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करावा. प्रेमाने समजूत घातल्यास मुलं तुमचं नक्की ऐकतील.

मुलांचे म्हणणे ऐकुण घ्या : अनेक वेळा मुलांना भांडताना किंवा वाद घालताना पाहून, बहुतांश पालक मुलांना ओरडून गप्प करतात. मात्र तुमच्या या वागण्याचा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि मुलांना राग येऊ लागतो. त्यामुळे मुलांना ओरडून शांत करण्यापेक्षा त्यांची संपूर्ण गोष्ट ऐकून घेतल्यानंतरच प्रतिक्रिया देणं श्रेयस्कर ठरते.

योग्य-अयोग्य यातील फरक समजवा : मुलांची वाद घालण्याची वाईट सवय सोडवायची असेल तर त्यांच्याशी बोलून, त्यांना योग्य गोष्ट कोणती, अयोग्य काय , यातील फरक समजवा. त्यानंतर त्यांना वाद घालण्याच्या दुष्परिणामांचीही जाणीव करून द्या. आणि वाद घालणे ही चुकीची सवय असल्याचे समजवा. मुलांशी गोड बोलून, त्यांना प्रेमाने समजावले, तर त्यांच्या चुकीच्या सवयींचा विळखा सुटू शकेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.