औरंगाबाद - बिहारच्या औरंगाबाद ( Bihar Aurangabad ) जिल्ह्यामधील नौगढ गावामध्ये ( Naugarh Village ) एका लग्नसमारंभात घराची गॅलरी कोसळून ( The gallery collapsed during wedding ) दुर्घटना घडली. लग्न समारंभ बघण्यासाठी महिलांनी गॅलरीमध्ये खूप गर्दी केली. गॅलरीत अतीशय जास्त वजन झाल्याने ती कोसळली. या घटनेत 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
गॅलरीत झाली जास्त गर्दी : नौगढमधील हरीबारी (Haribari Village) गावामध्ये 13 जूनला थाटामाटात एक विहाह समारंभ सुरू होता. नवरा-नवरीने एकमेकांना हार घालण्याच्या वेळी हा प्रसंग बघण्यासाठी या हॉलच्या गॅलरीमध्ये गर्दी झाली होती. त्यात आणखी काही महिला दाटीवाटीने घुसल्या. मात्र, हे वजन गॅलरीला पेलवले नाही आणि ती अचानक कोसळली. गॅलरी आणि त्यातील जमलेले लोक खाली लग्नसमारंभातील लोकांवर पडले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. लोक इकडे-तिकडे धावू लागले. या घटनेत 20 जणांहून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मगध मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
महिला, तरुणींना उत्साह नडला - या लग्न समारंभात गावातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची, तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. वरमाला घालण्याच्या प्रसंगी गॅलरीत महिला तरुणींनी एकच दाटीवाटी केली. गॅलरीत वजन वाढत गेले आणि ती खाली कोसळली. त्यानंतर एकच हल्लकल्लोळ उडाला. जखमींची संख्या 20 हून अधिक असल्याचे सांगितले जाते. जखमींत महिलांची संख्या जास्त आहे.
हेही वाचा - औरंगाबादच्या पाणी समस्येबाबत पंतप्रधानांनी लक्ष घालावे-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी