ETV Bharat / bharat

राजस्थान - बिकानेरमधील श्री बालाजी गावाजवळ अपघात, 11 जण ठार - Horrific road accident in Bikaner

बिकानेरमधील नोखा आणि नागौर जिल्ह्यातील श्री बालाजी पोलीस स्टेशनच्या श्री बालाजी गावाजवळ झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. 7 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघात
अपघात
author img

By

Published : Aug 31, 2021, 9:25 AM IST

बिकानेर - मंगळवारी, बिकानेरमधील नोखा आणि नागौर जिल्ह्यातील श्री बालाजी गावादरम्यान बालाजी पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या रस्ते अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बिकानेर-जोधपूर महामार्गावरील नोखा नागौर दरम्यान असलेल्या श्री बालाजी गावाजवळ क्रूझर कार आणि ट्रेलरची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तर 7 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना नोखा आणि बिकानेर येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझरमधील सर्वजण मध्य प्रदेशातील सज्जनखेड व दौलतपूरचे रहिवासी आहेत. जिल्हा नोखा नागौरचे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी जखमींना रुग्णालयात पाठवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.