ETV Bharat / bharat

Tomorrow Horoscope : 'या' राशींचे पुरुष प्रत्येक कामात यशस्वी होऊ शकतील, आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या, वाचा, उद्याचे राशी भविष्य - भविष्य

उद्या कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. उद्याची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 8 मार्चच्या दैनिक कुंडलीत उद्याचे राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Tomorrow Horoscope
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 7, 2023, 4:14 PM IST

मुंबई : जन्मकुंडलीतील उद्या 8 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा उद्याचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, उद्याचे राशी भविष्य.

मेष : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. मेष राशीच्या व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे. आपण एखाद्या काल्पनिक विश्वात रमून जाल. कलावंतांना आपली कला दाखवण्याची संधी लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. दैनंदिन कार्यात मात्र काही अडचणी निर्माण होतील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. परिश्रमाचे अपेक्षित यश मिळू शकणार नाही.

वृषभ : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चवथ्या भावात असेल. आज आपणास वाणी व वर्तनावर संयम ठेवावा लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळे जलाशयापासून दूर राहावे. जमीन किंवा संपत्तीच्या दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सही करताना काळजी घेण्याची गरज आहे. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. मनात सुंदर कल्पना येतील.

मिथुन : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आज सकाळी कार्यात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. या सर्वांमुळे सकाळी आपण आनंदात असाल. नशिबाची साथ लाभेल. दुपारनंतर मात्र परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक मतभेद संभवतात. मातेची प्रकृती नरम गरम होईल. मनात नकारात्मक विचार येतील.

कर्क : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आज द्विधा मनःस्थितीमुळे आपणास दीर्घकालीन योजनेचे आयोजन करताना अडचणी येतील. कुटुंबियांशी वाद होतील. दुपारनंतर मात्र परिस्थितीत अनुकूल बदल होईल. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. भावंडांकडून काही लाभ प्राप्ती होईल. भावनिक नाते दृढ होईल. मनास शांतता लाभेल.

सिंह : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज आपल्या दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक कामात आपण यशस्वी होऊ शकाल. मात्र, आपणास मन शांत ठेवावे लागेल. सरकारी कामातून फायदा होईल. कुटुंबियांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. खर्चात मात्र वाढ होईल.

कन्या : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आज भावनेच्या भरात आपल्या हातून एखादी मोठी चुक घडू शकेल. वाद होतील. दुपारनंतर मात्र आत्मविश्वास वाढेल. सामाजिक मान - प्रतिष्ठेत वाढ होईल. रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल.

तूळ : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. त्यांच्याकडून एखादा फायदा संभवतो. व्यापारात लाभ होईल. कुटुंबियांशी सौहार्दाचे संबंध राहतील. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्य नाजूक होईल. वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. एखादा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

वृश्चिक : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. दृढ मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर आज आपली सर्व कामे आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. नोकरी - व्यवसायात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. नोकरीत आपल्या कामगिरीवर वरिष्ठ खुश होतील व त्यामुळे आपल्या पदोन्नतीची शक्यता वाढेल. वडिलधार्यांशी आपले संबंध सौहार्दाचे होतील. तसेच त्यांच्या कडून एखादा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांकडून सुद्धा फायदा होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर आपले विचार प्रगल्भ होतील.

धनू : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपण सकाळी एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. एखादे नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. आपली कामे सहजपणे होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.

मकर : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज सकाळी प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. एखादा प्रवास संभवतो. मनःशांती लाभेल. रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल.

कुंभ : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. लहानसहान गोष्टींवरून वैवाहिक जीवनात वाद होतील. हे वाद विकोपास जाऊ शकतात. सांसारिक प्रश्नांविषयी आपण उदासीन व्हाल. कोर्ट - कचेरी पासून दूर राहावे. एखादी मानहानी संभवते. आपण नवीन कामाची सुरवात करू शकाल. स्फूर्ती व प्रसन्नतेचा अभाव जाणवेल.

मीन : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मन चिंतीत होईल. कार्यात अडचणी येऊन ती पूर्ण होण्यास विलंब होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. वैवाहिक जीवनात कटकटी निर्माण होतील. सांसारिक जीवनाचा कंटाळा येईल. व्यापारात भागीदारांशी मतभेद संभवतात. शक्यतो कोर्ट - कचेरी पासून दूर राहावे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.