मेष हा आठवडा आपल्यासाठी बराचसा चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासून आपली कामावरील पकड चांगली राहिल्याने आपणास प्रत्येक कार्यात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांना नशिबाची साथ मिळून कष्टाचे यथोचित फळ मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीची प्रशंसा करतील. आठवड्याच्या मध्यास आपण आपल्या कौटुंबिक जीवनावर सुद्धा लक्ष द्याल. आपले संपूर्ण लक्ष आपल्या आई - वडिलांच्या प्रकृतीवर असेल. आपण त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाऊ शकाल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपल्या प्राप्तीत वाढ होईल. येणाऱ्या तेजीने आपण सुखावले जाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्य राहील. प्रणयी जीवनातील आपली वागणूक सामान्यच असेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणावाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अनुभवी लोकांचे सहकार्य मिळाल्याने ते अधिक चांगला अभ्यास करू शकतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
वृषभ हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवाती पासून व्यवसायात नफा होऊ लागल्याने आपण खूपच आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होत असल्याचे दिसून येईल. परंतु, बँके कडून घेतलेल्या कर्जामुळे आपली मानसिक चिंता वाढून आपण व्यथित होण्याची संभावना आहे. आठवड्याच्या मध्यास ह्या चिंतेतून बाहेर पडण्याचा मार्ग आपणास सापडल्याने आपण आनंदित व्हाल. आपली काळजी कमी होऊ लागेल. प्रकृती चांगली राहिली तरी ती बिघडणार नाही ह्याची काळजी घ्यावी. आपण मित्रांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. प्रेमीजनांचे प्रणयी जीवन सुखद होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुद्धा अद्भुत राहील. आपणास आपल्या वैवाहिक जोडीदारावर पूर्ण विश्वास असेल. आपण दोघेही आनंदात राहाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाचा आनंद घेता येईल. जे स्वतःचे काम इमानदारीने करतात त्यांना सुद्धा व्यवसाय करण्याची कला अवगत होऊन त्याची अंमल बजावणी करण्याचा प्रयत्न सुद्धा ते करतील. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
मिथुन हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. व्यापारात जलद गतीने प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. आपण आपल्या कामात पारंगत व्हाल. आपली कामे आपण उत्तम प्रकारे पूर्ण करू शकाल. आपणास वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. लहान - सहान खर्च झाले तरी प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात समजूतदारपणा असल्याचे दिसून येईल. आपला वैवाहिक जोडीदार आपणास कामात मदत करेल. प्रेमीजन चिंतीत असून सुद्धा आपल्या प्रेमिकेशी जवळीक साधू शकतील. कौटुंबिक वातावरण सुखद असेल. आपली प्रकृती चांगली राहील. आपली वाणी आकर्षक राहील. आपले व्यक्तिमत्व खुलून उठेल. विद्यार्थी खोलात शिरून अभ्यास करतील. त्यामुळे त्यांचा समजूतदारपणा वाढेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कर्क ह्या आठवड्यात आपण कल्पना विश्वात वावराल. काहीतरी विधायक कार्य करण्याचा विचार कराल. आपणास प्रॉपर्टीतून लाभ मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. प्रणयी जीवन सुखद होईल. आपण आपल्या प्रेमिकेप्रती खूपच भावनाशील होऊन तिचा खूपच चांगल्या पद्धतीने सांभाळ कराल. तिला एखादी सुंदरशी भेट सुद्धा देऊ शकाल. विवाहित व्यक्ती आपले संबंध अधिक दृढ करतील. वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपण शासनाकडू एखादे फायदेशीर काम सुद्धा मिळवू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. त्यांची कामगिरी उत्तम होईल. आपण सामाजिक माध्यमांवर खूपच व्यस्त राहाल. आपल्या एखाद्या फोटोला किंवा विडिओला खूप पसंती मिळू शकेल. त्यामुळे आपण आनंदित व्हाल. आपणास नशिबाची साथ मिळेल. प्रकृती उत्तम राहील. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढल्याने त्यांना अभ्यासात चांगला फायदा होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
सिंह हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपणास काही नवीन योजनांवर काम करावे लागेल. हि कामे आपल्यासाठी आव्हानात्मक असतील. परंतु, आपण इच्छा शक्तीच्या जोरावर ती सहजपणे करून त्यात यश मिळवू शकाल. विद्यार्थी एखाद्या स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करून आनंदित होतील. त्यांचे मनोबल उंचावल्याने अभ्यासात त्यांना चांगले परिणाम मिळू शकतील. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात प्रवासाची संधी मिळेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढ - उतार येतील. प्रेमीजनांना आपल्या प्रेमिके समोर आपले मन मोकळे करण्याची संधी मिळेल. ते आपले संबंध अधिक दृढ करू शकतील. व्यापाऱ्यांना आपल्या कामात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची आपल्या कामावरील पकड मजबूत होईल. ते प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने उचलतील. आपली प्रकृती चांगली राहील. कुटुंबात एखादी चांगली बातमी ऐकिवात येईल. आपण स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
कन्या हा आठवडा आपणास मजबुती प्रदान करणारा आहे. आपण आपल्या कुटुंबाच्या गरजांना समजू शकाल. आपण कुटुंबियांच्या सहवासात बराचसा वेळ घालवू शकाल. आपण कुटुंबियांसह एखाद्या लांब पल्ल्याच्या प्रवासाचे आयोजन सुद्धा करू शकाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात समाधानी राहतील. आपला वैवाहिक जोडीदार खरोखरच आपल्यासाठी योग्य असल्याचे आपणास जाणवेल. हा विचार आपले संबंध अधिक दृढ करेल. व्यापाऱ्यांना व्यापारात लाभ होईल. आपले कार्य जलद गतीने प्रगती करेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कार्य कौशल्यामुळे व कामगिरीमुळे सन्मानित होतील. आपली एक वेगळी ओळख निर्माण होईल. विद्यार्थी आपला अभ्यास सतर्कतेने करतील. आठवड्याचे सुरवातीचे व मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
तूळ हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण प्रवास करू शकाल. तसेच आपली अत्यंत महत्वाची कामे पूर्ण करण्याचा विचार सुद्धा कराल. थोडा खर्च होईल. आपण घरात आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी कराल. त्यामुळे खर्च वाढतील. आपण एखादा नवीन फोन किंवा टेलिव्हिजन सुद्धा खरेदी करू शकाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामा निमित्त भरपूर प्रवास करतील. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापार विस्तारासाठी काही नवीन कामे करावी लागतील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्यच आहे. आपणास आपल्या प्रेमिकेची ओळख कुटुंबियांना करून द्यावी लागेल. असे केल्याने आपले संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज भासेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
वृश्चिक हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखादा प्रवास करू शकाल. आपणास कामा निमित्त खूप प्रवास करावे लागतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेम व स्नेहाने भरलेले असेल. आपणास एखादा मोठा लाभ मिळण्याची संभावना असल्याने आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासाठी एखादी अद्भुत भेटवस्तू खरेदी करू शकाल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या संबंधांप्रती खूपच गंभीर व्हाल. आपल्या प्रेमिके समोर विवाहाचा प्रस्ताव सुद्धा ठेवू शकाल. आपल्या मित्रांना सुद्धा आपल्या कडून चांगली बातमी ऐकावयास मिळेल. प्रणयी जीवन दृढ करण्यात आपणास मित्रांची मदत होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या कामात प्रगती करू शकाल. आपल्यात चांगली ऊर्जा असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले गुण मिळू शकतील. स्पर्धेत सुद्धा ते यशस्वी होतील. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
धनू हा आठवडा आपणास खूपच यश प्राप्त करून देणारा आहे. आपण मानसिक दृष्ट्या अत्यंत मजबूत व्हाल. आनंदित राहिल्याने आपल्या आत्मविश्वासात सुद्धा वाढ होईल. नोकरीत चांगली कामगिरी झाल्याने बढती मिळण्याची संभावना आहे. आपल्या मनावर आपले नियंत्रण राहिल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. लहान - सहान संघर्ष होण्याची शक्यता असल्याने आपण शांत राहून आपली कामे करावीत. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. अनेक दिवसां नंतर आपण आपल्या प्रेमिकेसह फिरावयास जाऊ शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आपण खूप मेहनत करून प्रत्येक स्पर्धेत यशस्वी होऊ शकाल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
मकर हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण बाहेर जाण्याचे आयोजन कराल. त्यामुळे खर्चात वाढ होईल. थोडा मानसिक ताण सुद्धा येईल. विशेषतः आठवड्याच्या मध्यास आपणास एकटेपणा जाणवेल. परंतु, हे चिंतेचे कारण नसेल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात कुटुंबियांचे सहकार्य मिळून त्यांच्या सहवासात बराचसा वेळ घालवू शकाल. कौटुंबिक जीवन आनंदित होईल. प्रेमीजनांना प्रेमिकेसह बाहेर फिरावयास जाऊन आपला वेळ घालवावा लागेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. व्यावसायिक व्यक्ती स्वतःच्या व्यावसायिक हेतूने काही नवीन लोकांशी संपर्क करतील. त्यामुळे भागीदारीत सुद्धा वाढ होऊ शकेल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांना यश देणारा आहे. खूप मेहनत करून हे यश प्राप्त करावे. विद्यार्थ्यांना वाचन करण्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल. आठवड्याचा अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.
कुंभ हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. प्राप्तीत वाढ झाल्याने मन प्रसन्न होईल. आपल्या प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा आपल्या खिश्यावर खर्चाचा ताण वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरातील विवाह योग्य व्यक्तीचा विवाह ठरण्याची संभावना आहे. कौटुंबिक जीवन सामान्यच राहील. प्रेमीजनांचे प्रणयी जीवन प्रेमाने भरलेले असेल. आपण आपल्या प्रेमिकेशी जवळीक साधू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण एकमेकांना समजून घेऊन आपले व्यक्तिगत जीवन सुखद करू शकाल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा फायदा मिळवून देणारा आहे. आपण चांगली गुंतवणूक करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्यच आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात काही नवीन लोकांचे सहकार्य मिळेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
मीन हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगला आहे. आपल्या कामासाठी आपणास एखादा पुरस्कार मिळण्याची संभावना आहे. आपण एखादा प्रवास करण्याची शक्यता सुद्धा आहे. आपले वरिष्ठ सुद्धा आपल्या कार्यक्षमतेने प्रभावित होऊन आपली प्रशंसा करतील. ह्या आठवड्यात व्यावसायिक हेतूने आपणास भरपूर प्रवास करावे लागतील. तरी सुद्धा आपल्या आवडीचे काम पूर्ण होण्यास थोडा विलंब होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. रोमांसच्या बरोबरीने संबंधात प्रेमाने भरलेल्या सुखद क्षणांची आठवण सुद्धा राहील. आपल्या वैवाहिक जोडीदारा कडून आपणास एखादे नावीन्य बघावयास मिळून संबंध अधिक दृढ होतील. प्रेमीजन आपल्या संबंधांच्या प्रती अधिक गंभीर होतील. आपली प्रेमिका स्वतःच्या समस्याने त्रस्त असेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. ते आपला अभ्यास सहजपणे करू शकतील. त्यांची एकाग्रता वाढेल. आठवड्याचे सुरवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.Weekly horoscope, What will be the position of the planets, 2nd TO 8th OCTOMBER 2022, Weekly Rashibhavishya