ETV Bharat / bharat

Weekly Horoscope : 'या' राशींचा नवीन वर्षाचा आठवडा जाईल आर्थिक लाभ देणारा; वाचा, साप्ताहिक राशीभविष्य - या राशींचा आठवडा जाईल आर्थिक लाभ देणारा

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य Weekly horoscope, What will be the position of the planets,01 TO 07 JANUARY, HOROSCOPE FOR THE WEEK

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य
author img

By

Published : Jan 1, 2023, 12:12 AM IST

मेष : वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस मनात नवीन उमेद घेऊन आला तरी थोडा तणाव असू शकतो. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात असलेले तणाव त्रासदायक ठरू शकतात. प्रेमीजनांना आपल्या प्रियव्यक्तीसह दूरवर फिरावयास जाण्याची संधी मिळेल. आर्थिक दृष्ट्या आठवडा अनुकूल राहील. खर्चात कपात होईल. धार्मिक कार्यांवर खर्च करू शकाल. मान - सन्मानात वाढ होईल. कार्यक्षेत्रात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या नोकरीत जागरूक राहून खूप मेहनत करतील. व्यापाऱ्यांना सध्या चढ - उताराना सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांचा अभ्यास उत्तम होईल. अभ्यासात अतिरिक्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. कमी प्रयत्नांत सुद्धा चांगले परिणाम मिळतील. प्रकृती मात्र काहीशी नाजूक राहील. प्रकृतीत चढ - उतार होताना दिसतील. सध्या तणावास थारा देऊ नये. ह्या आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृषभ : वर्षाचा हा पहिला आठवडा आपणास अनुकूल असा आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन मात्र काहीसे तणावग्रस्त असू शकते. वैवाहिक जोडीदाराशी वाद होऊ नये म्हणून आपणास खूप खटाटोप करावा लागेल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा उत्तम आहे. आपणास आपल्या प्रियव्यक्तीशी लग्नगाठ बांधण्याची बातमी सुद्धा मिळू शकते. आठवड्याच्या पहिल्या दिवशी मानसिक तणाव व खर्चात वाढ होत असल्याचे दिसून येईल. त्यामुळे आपले अंदाजपत्र कोलमडू शकते. सध्या आपल्यात खूप आत्मविश्वास असेल, व त्याने आपणास कामात यश प्राप्त होईल. प्राप्ती सुद्धा चांगली होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती खूप मेहनत करतील, त्यामुळे त्यांना कामात यश प्राप्त होईल. लोकांच्या नजरेत आपली मेहनत भरेल व आपले वरिष्ठ आपल्या पाठीशी उभे राहतील. व्यापाऱ्यांना चांगले यश प्राप्त होईल. रिअल इस्टेटशी संबंधित बाबीत यश प्राप्ती होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. ते मन लावून अभ्यास करतील, ज्याचे त्यांना चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहील. कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असे दिसत नाही. आठवड्याचे अखेरचे तीन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मिथुन : आठवड्याची सुरवात मध्यम होईल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात अत्यंत खुश असतील. त्यांना वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. वैवाहिक जोडीदाराची बुद्धिमत्ता आपणास आनंदित करेल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा तितकासा अनुकूल नाही. त्यांच्या नाते संबंधात दुरावा वाढण्याची संभावना असल्याने त्यांनी सावध राहावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा चांगला आहे. आपला अनुभव आपल्या कामी येऊन आपणास कार्यक्षेत्रात यश प्राप्त होईल. व्यापारी सुद्धा आपल्या क्षेत्रात आपली स्थिती मजबूत करू शकतील. आपल्या व्यवसायात वाढ होईल व त्यामुळे आपण आनंदित व्हाल. आपल्या प्राप्तीत वाढ तर होईलच, परंतु मानसिक ताण सुद्धा वाढेल. आठवड्याच्या मध्यास खर्च वाढतील. प्रॉपर्टीशी संबंधित काही खर्च होण्याची संभावना आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चढ - उतारांचा आहे. अशा परिस्थितीत त्यांना अभ्यासावर अधिक लक्ष द्यावे लागेल. ह्या आठवड्यात आपले आरोग्य काहीसे नाजूक राहील. तेव्हा आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कर्क :आठवड्याची सुरवात आपल्यासाठी चांगली असेल. विवाहितांच्या जीवनात असलेल्या समस्यांचे निराकरण होईल. समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. त्यासाठी एखाद्या मित्राची मदत आपण घेऊ शकता. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा चढ - उतारांचा आहे. असे असले तरी नात्यातील प्रेम टिकून राहील. कार्यक्षेत्रात यश प्राप्ती होईल. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती मजबूत होईल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उन्नतीदायक आहे. आपण दूरवरचे प्रवास करून व्यापारात प्रगती करण्यात यशस्वी व्हाल. कोर्ट - कचेरीशी संबंधित बाबीत यश प्राप्ती होऊन आपल्या खर्चात कपात होईल. जर आपल्या मनात एखादा विचार आला असेल तर तो आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीस सांगून मनावरील ताण हलका करावा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल असेल.

सिंह: २०२३ चा हा पहिला आठवडा आपल्यासाठी लाभदायी ठरेल. विवाहितांना एकमेकांत ऐक्य असल्याचे जाणवू शकते. आपले नाते आपल्यासाठी उत्तम असेल. आपण आपल्या नात्यात एकमेकांच्या मनातील गोष्ट न सांगता सुद्धा समजू शकाल. त्यामुळे आपले नाते अधिक दृढ होईल. आठवड्याच्या सुरवातीस एखादा दूरवरचा प्रवास करू शकाल. तीर्थयात्रा करण्यास सुद्धा आपली पसंती असू शकते. त्यामुळे आपल्या मनास शांतता लाभेल. कामासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्यांची स्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी आपली कामगिरी चांगली होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपल्या महत्वाकांक्षा आपणास प्रगती पथावर जाण्यास प्रेरित करतील. आपली निर्णयशक्ती वृद्धिंगत होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. त्यांना चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावे लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

कन्या : आपल्यासाठी महिन्याची सुरवात काहीशी नाजूक राहील, परंतु जस जसे दिवस पुढे सरकत जातील तस तसे आपणास मार्ग सापडत जातील. हा आठवडा विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी अनुकूल आहे. प्रणयी जीवनासाठी मात्र हा आठवडा चढ - उतारांचा आहे. एकीकडे आपल्या नात्यात प्रेम असेल तर दुसरीकडे दुरावा निर्माण होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा उन्नतीचे द्वार उघडेल. आपल्या कामाची प्रशंसा होऊन आपणास प्रगती पथावर जाण्याची संधी मिळेल. आपण जर व्यापार करत असाल तर आपल्या अनुभवाचा आपणास लाभ होईल. आपण बाजारात आपली स्थिती मजबूत करू शकाल. आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, मात्र शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष दिले तरी काही अडथळे येण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक किरकोळ तक्रारी उदभवू शकतात. ऋतू बदलाचा प्रभाव सुद्धा आपल्या आरोग्यावर होताना दिसू शकतो. तेव्हा आरोग्याकडे लक्ष द्यावे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस वगळता मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

तूळ : २०२३ चा हा पहिला आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी राहील. विवाहितांना वैवाहिक जीवनात किरकोळ तणाव जाणवतील. वैवाहिक जोडीदाराशी परस्पर संवाद साधून स्थिती नियंत्रित होऊ शकते. प्रणयी जीवनासाठी आठवडा काहीसा नाजूक आहे. असे असले तरी आपण प्रियव्यक्तीची ओळख आपल्या कुटुंबियांना करून देऊ शकता. आपल्या मनात विचारांचे वादळ उठेल, जे आपणास व्यस्त ठेवेल. आपल्या जीवनात चढ - उतारांची स्थिती राहील. कौटुंबिक जीवनात आनंदासह काहीसा तणाव सुद्धा दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांची स्थिती चांगली राहून त्यांच्या कामगिरीत सुधारणा होईल. व्यापाऱ्यांना आपल्या नवीन काही योजना पुढे रेटण्याची गरज भासेल. असे केल्यानेच व्यापारात प्रगती होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. त्याचे चांगले परिणाम सुद्धा त्यांना मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा नाजूकच आहे. तेव्हा आपणास स्वतःची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

वृश्चिक : २०२३ चा हा पहिला आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहितांना वैवाहिक जीवनात थोडा तणाव जाणवेल, परंतु परस्पर सहमती व समजुतीने गोष्टींच्या खोलात जाऊन समस्या सोडवू शकाल व वेळ आनंदात घालवू शकाल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या नात्याचा आनंद लुटू शकाल. आपणास एकमेकांचा सहवास जाणवेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपली पगारवाढ होण्याची संभावना आहे. वरिष्ठांशी आपला ताळमेळ सुद्धा चांगलाच राहील, व त्यामुळे आपणास कार्यक्षेत्रात लाभ होईल. आपली प्रतिमा उज्ज्वल होईल. आपल्या सहकार्यां बरोबर नीट वागावे, अन्यथा एखादी समस्या उदभवू शकते. व्यापारी आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपल्या व्यापाराच्या बाबतीत प्रामाणिक राहून खूप मेहनत करतील, व आपल्या कामास एक नवी दिशा देतील. त्यामुळे त्यांना चांगला लाभ होईल. हा आठवडा आर्थिक बाबतीत अनुकूल राहील. किरकोळ खर्च होतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. त्यांना नवीन काही शिकण्याची इच्छा होईल. त्यामुळे अभ्यासात त्यांची स्थिती चांगली राहील. आरोग्याचा विचार करता विशेष त्रास होईल असे दिसत नाही. मानसिक तणावास जर बाजूस सारले तर हा आठवडा आपल्यासाठी चांगला ठरेल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

मकर : हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपल्या मानसिक समस्यांना वैवाहिक जोडीदाराशी वादाच्या स्वरूपात वाढू देऊ नका. ह्या उलट त्यांच्याशी असे वागा कि जेणेकरून आपले दांपत्य जीवन सुखद होईल. प्रेमीजनांना मनातील भावना आपल्या प्रिय व्यक्तीस सांगण्याची भरपूर संधी मिळेल. त्यामुळे आपले नाते अधिक सुदृढ होऊन त्यात सकारात्मकता येईल. आठवड्याची सुरवात वगळता उर्वरित दिवस चांगले आहेत. आपणास आपल्या मानसिक तणावातून बाहेर पडून काहीतरी नवीन करण्याचा विचार करावा लागेल. असे केल्यास आपणास निव्वळ यश प्राप्तीच होणार नसून आपण सकारात्मकतेने प्रत्येक काम पूर्ण करू शकाल. नोकरी करणाऱ्यांनी आपली स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी आता पासूनच कंबर कसावी. प्रयत्न चालूच ठेवा. व्यापाऱ्यांना आपल्या प्रतिभेचा फायदा उचलण्याची संधी मिळेल व त्यांचा विश्वास द्विगुणित होईल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची अत्यंत आवश्यकता भासेल. त्यासाठी वेळा पत्रक बनवून अभ्यास केल्यास फायदा होईल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आहारावर सुद्धा लक्ष द्यावे.

कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात काही त्रास जाणवेल. त्यामुळे त्यांना आपल्या वैवाहिक जोडीदाराशी संवाद साधावा लागेल. प्रेमीजनांना चांगले परिणाम मिळतील. आपण प्रियव्यक्ती समोर आपल्या भावना व्यक्त करण्यात यशस्वी व्हाल. सध्या खर्चात वाढ झाली तरी प्राप्ती सुद्धा चांगलीच होईल. आठवड्याच्या सुरवातीस आपण मित्रांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत यश प्राप्त होईल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपणास आपल्या मर्जी प्रमाणे काम करण्यात यश प्राप्त होईल. व्यापाऱ्यांना चांगला नफा होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात एकाग्रचित्त होईल. त्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत घसरण होण्याची संभावना असल्याने आपणास प्रकृतीवर लक्ष द्यावे लागेल. आठवड्याच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मीन : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. असे असले तरी भावंडांना काही समस्या असू शकतात. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेता येईल. प्रेमीजनांना रोमँटिक क्षण घालविण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या सुरवातीस धन प्राप्ती होईल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती बळकट होईल. ह्या पूर्ण आठवड्यात आपल्याकडे पैश्यांचा ओघ चालूच राहील. शारीरिक समस्या दूर होऊ लागतील. आपली इच्छापूर्ती होईल. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्याने मन आनंदून जाईल. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे जावे लागेल. व्यापाऱ्यांना सुद्धा चांगला फायदा होईल. विदेशी संपर्कातून लाभ होईल. आपले साहस वाढेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल. त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक कोणतीही मोठी समस्या उदभवणार नाही असे दिसत आहे. Weekly horoscope, What will be the position of the planets,01 TO 07 JANUARY, HOROSCOPE FOR THE WEEK

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.