मेष - आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. आज प्राप्तीत वाढ होईल. कलावंत, कारागिर ह्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल व त्यात त्यांची कदर सुद्धा केली जाईल. नकारात्मक विचारा पासून दूर राहावे.
वृषभ - आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्याने सुख व आनंद अनुभवाल. सगे - सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. प्रवास व स्वादिष्ट भोजन ह्यामुळे आजचा दिवस आणखीच आनंदी होईल. आर्थिक फायदा संभवतो. आज वैवाहिक जीवनातील सौख्य प्राप्त होईल.
मिथुन - आज आपले संयमशील व विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टीं पासून आपला बचाव करू शकेल. आपल्या वक्तव्याने गैरसमज निर्माण होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कौटुंबिक वातावरण गढूळ राहील. डोळ्यांना पीडा होईल. खर्च जास्त होईल. मानसिक शांतीसाठी आपणास प्रयत्न करावे लागतील.
कर्क - आज अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापार्यांशी फायद्याचे सौदे होतील. संतती व पत्नी ह्यांच्याकडून लाभ होईल. प्रवास, पर्यटन संभवतात. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. आज उत्तम भोजन व स्त्रीसुख मिळेल.
सिंह - आज आपणास प्रत्येक कामात उशीरा यश मिळेल. कार्यालयात किंवा घरात जबाबदार्यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. नवीन संबंध स्थापित करणे किंवा कामासंबंधी महत्वाचा निर्णय घेणे हे टाळा. पित्याशी मतभेद होतील. शुभ कार्य ठरविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही.
कन्या - आज शरीरात थकवा, आळस व चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. नोकरीत वरिष्ठांशी आपला वाद होईल. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल. एखादे मांगलिक कार्य किंवा प्रवास ह्यासाठी पैसा खर्च होईल. भावंडां कडून लाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ - आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. टाकून बोलणे किंवा खराब व्यवहार ह्या मुळे वाद व भांडणे होतील. क्रोध, व कामवृत्ती ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल. वेळेवर जेवण न मिळणे किंवा होणारा अधिक खर्च आपल्या मनाला अस्वस्थ करतील. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहणे हिताचे राहील.
वृश्चिक - आज आपणास नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय ह्यातून भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्या कडून ही लाभ होईल. सामाजिक समारोह, पर्यटन यासारख्या ठिकाणी जाऊ शकाल. आपण आनंदी राहाल. संपत्ती वाढेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
धनू - आजचा दिवस आर्थिक व व्यापारी नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. कार्ये यशस्वी होतील. आज परोपकाराची भावना प्रबळ होईल. आजचा दिवस आनंदात व्यतित होईल. नोकरी - व्यवसायात उन्नती व मान-सन्मान प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात आनंदी आनंद असेल.
मकर - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज बौद्धिक कामे व व्यवसायात आपण नवी विचार प्रणाली अंमलात आणाल. लेखन व साहित्य क्षेत्रात आपली सृजनात्मकता दिसेल. तरीही मनाच्या एका कोपर्यात अस्वस्थता जाणवेल. परिणाम असा होईल की त्यामुळे शारीरिक थकवा व ऊबग येईल. संततीच्या प्रश्ना संबंधी चिंता निर्माण होईल. वरिष्ठ व प्रतिस्पर्धी ह्यांच्या बरोबर चर्चेत भाग न घेणे हेच हितकर होईल.
कुंभ - आज नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग व क्रोध आपल्या मनात जागा घेईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील. स्वास्थ्य खराब होईल. दुर्घटनेपासून स्वतःला सांभाळा. मनास शांती लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
मीन - आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्यांना भागीदारीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पति - पत्नी वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. मित्र, स्वजन ह्यांचा सहवास घडेल. प्रणयाराधन वाढेल. सार्वजनिक जीवनात प्रगती होईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल.