मेष - आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणास सांसारिक बाबींचा विसर पडेल. गूढ, रहस्यमय विद्या ह्याची गोडी लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही. हितशत्रूंचा त्रास होईल. आज शक्यतो नवीन कार्य सुरू करू नका.
वृषभ - आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणास वैवाहिक जवळीक साधता येईल. कुटुंबीयांसह सामाजिक समारंभासाठी बाहेर फिरणे किंवा सहलीला जाणे झाल्याने वेळ आनंदात जाईल. शरीर व मनाला प्रसन्नता वाटेल. सार्वजनिक जीवनात यश व कीर्ती मिळेल. व्यापारी आपल्या व्यापारात विकास करू शकतील. भागीदारीत लाभ होईल. अचानक धनलाभ होईल. विदेशातून बातम्या मिळतील.
मिथुन - आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांततेचे व आनंदाचे वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. खर्च होईल पण तो कारणी लागेल. आर्थिक लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील. कामात यश मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. खोळंबलेली कामे पूर्ण होतील. संतापाचे प्रमाण मात्र वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
कर्क - आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरूवात चिंता व उद्वेगाने होईल. आरोग्याच्या तक्रारी पण राहतील. नवे काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. अचानक धन खर्च होईल. प्रेमीजनांत वाद - विवाद होऊन मतभेद किंवा बोलाचाली होईल. एखादी मानहानी संभवते. प्रवासात अडचणी येतील.
सिंह - आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आई - वडिलांशी मतभेद होतील. त्यांची प्रकृती बिघडेल. जमीन, घर, वाहन खरेदी विषयक कागद पत्रांसंबंधी सावध राहा. जलाशया पासून जपा. भावनेच्या भरात वाहवत जाऊ नका.
कन्या - आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. भावंडे व शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. समाजात मान - सन्मान मिळेल. चित्तवृत्ती प्रफुल्लित राहील.
तूळ - आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपला हट्टीपणा सोडून समाधानी वृत्तीने काम करावे. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. द्विधा स्थितीत अडकलेले मन कोणताही ठोस निर्णय घेऊ देणार नाही. आज शक्यतो महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
वृश्चिक - आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपण तन - मनाने खुश व ताजेतवाने राहाल. कुटुंबीय व मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, मनोरंजन होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. आर्थिक लाभ होईल. मंगल कार्या निमित्त बाहेर जावे लागेल. आनंददायक बातम्या मिळतील.
धनू - आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस कष्टदायक आहे. प्रकृती बिघडेल. कुटुंबियांशी कटकट झाल्याने मन दुःखी होईल. व त्यामुळे मानसिक दृष्टया सुद्धा अस्वस्थ राहाल. रागावर जरा अंकुश ठेवा. एखादी दुर्घटना संभवते. कोर्ट - कचेरीतील प्रकरणांपासून सावध राहा. अधिक खर्च झाल्याने पैशाची चणचण भासेल.
मकर - आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस नोकरी - व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत शुभ फळे देणारा आहे. मित्र व आप्तेष्टांसह फिरावयास जाल. मंगल कार्यात हजेरी लावाल. मैत्रिणी, पत्नी व संतती यांच्याकडून लाभ होईल. विवाहोत्सुक युवक - युवतींचे विवाह ठरतील. प्रवास व सहल होईल.
कुंभ - आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने आपण खुश व्हाल. नोकरी - व्यवसायात परिस्थिती आपणास अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. वडीलधारी व वरिष्ठ अधिकारी यांची मर्जी असल्याने कोणत्याही प्रकारच्या मानसिक दडपणातून मुक्त व्हाल. संसारात आनंद वाटेल. धनप्राप्ती तसेच बढती संभवते.
मीन - आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. आरोग्याची तक्रार राहील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. संततीच्या समस्या सतावतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकणार नाही. आज शक्यतो कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका.