मेष - आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इत्यादींचा त्रास होईल. पारमार्थिक काम करताना दाम खर्च करावा लागेल. त्यामुळे खर्च वाढेल. मोहाच्या प्रलोभना पासून दूर राहणे योग्य ठरेल. जमीन, घर इत्यादींच्या कागदपत्रात फसवणूक होण्याची शक्यता आहे. आईची प्रकृती बिघडेल. निर्णय शक्ती डळमळीत राहिल्यामुळे द्विधा अवस्थेत अडकाल.आज कोणाला जामीन राहू नये.
वृषभ - आज आपली प्राप्ती व व्यापार ह्यात वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. कुटुंबीय व मित्रांसह हसण्या - खेळण्यात क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रवास - पर्यटनाचे योग आहेत. आज विशेषतः महिला वर्गाकडून लाभ होतील. वैवाहिक जोडीदाराशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होऊन जवळीक वाढेल. भावंडे व वडीलधार्यां कडून लाभ होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
मिथुन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. सहकारी व वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक मान - मरातब वाढेल. बढतीची शक्यता आहे. स्नेहीजनां कडून भेटवस्तू मिळतील. आरोग्य उत्तम राहील. प्रापांचिक जीवन आनंदपूर्ण राहील.
कर्क - आज मांगलिक कार्यात आपला सहभाग असेल. मांगलिक कार्यात सहभागी झाल्याने आनंदित व्हाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. आरोग्य उत्तम राहील. मन पण चिंतामुक्त होईल. अचानक धनलाभ संभवतो. नशिबाची साथ लाभेल.
सिंह - आज खूप सावध राहावे लागेल. आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती बिघडल्याने अचानक खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे. मानसिक शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
कन्या - सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल. उंची वस्त्रे व अलंकाराची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. भागीदारांशी चांगले संबंध राहातील. पती - पत्नीतील दुरावा संपून जवळीक निर्माण होईल.
तूळ - घरातील सुखा-समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कामात यश प्राप्ती होईल. माता - पिता ह्यांच्या कडून काही चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
वृश्चिक - आज आपण वाद - विवादात अडकाल. संतती विषयी चिंता लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. शेअर्स व सट्टा ह्यात गुंतवणूक न करणे हितावह राहील. शक्य असेल तर प्रवास टाळा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. केलेल्या कष्टाचे यथोचित यश सुद्धा मिळेल.
धनू - आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असेल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायक असेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. स्थावर मिळकतीचे व्यवहार करताना सावध राहावे. धनहानी व मानहानी संभवते. मातेच्या स्वास्थ्याविषयी चिंता राहील. छातीचे दुखणे त्रास देऊ शकते.
मकर - आजचा दिवस मित्र-परिवारासह आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्थावर मिळकती संबंधीची कामे आज करू शकाल. व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अनुकूलताच लाभेल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. स्वास्थ्य टिकून राहील. आज आर्थिक लाभ होऊ शकतात. नवीन कामाची सुरूवात आज करू शकता.
कुंभ - आज द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास होईल. निरर्थक खर्च होतील. बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळी मन एकाग्र होणार नाही. कामे यशस्वी होण्यास उशीर लागेल.
मीन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. उत्साह व स्वास्थ्य टिकून राहील. नवीन कार्यारंभासाठी दिवस अनुकूल आहे. मित्र व कुटुंबीयांसह भोजनाचा आस्वाद घ्याल. धनलाभ संभवत असला तरी खर्च वाढणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. एखादा प्रवास संभवतो. कार्यात यशस्वी व्हाल.